शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

‘मुन्नाभाई’ व त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल

By admin | Updated: July 6, 2015 03:04 IST

मेडिकलच्या स्त्री-रोग विभागाच्या वॉर्डात शुक्रवारी डॉक्टरचे ‘अ‍ॅप्रॉन’ घालून फिरणारा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या बोगस डॉक्टरावर

मेडिकल : बोगस डॉक्टर प्रकरणनागपूर : मेडिकलच्या स्त्री-रोग विभागाच्या वॉर्डात शुक्रवारी डॉक्टरचे ‘अ‍ॅप्रॉन’ घालून फिरणारा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या बोगस डॉक्टरावर तर त्याला मदत करणाऱ्या इंटर्न विद्यार्थ्याच्या विरोधात अजनी पोलीस ठाण्याने गुन्हा नोंदविला आहे. राहुल जनार्धन खंबाळकर (२५) रा. मून वॉर्ड नं. ९, जिल्हा चंद्रपूर असे त्या बोगस डॉक्टराचे नाव असून त्याला मदत करणारा युवराज लहरे(२४) रा. रायगड, छत्तीसगड असे आरोपीचे नाव आहे. मेडिकलमध्ये शुक्रवारी निवासी डॉक्टरांचा संप सुरू होता. परिणामी इंटर्नवर रुग्णसेवेची जबाबदारी सोपविण्यात आली. होती. त्यानुसार इन्टर्न युवराज लहरे याची ड्युटी वॉर्ड क्र.२२ मध्ये लावण्यात आली होती. परंतु युवराज याने आपल्या जागी ‘बीपीएमटी’ या पॅरामेडिकलचा विद्यार्थी असलेला राहुल खंबाळकर याला पाठविले. राहुल अ‍ॅप्रॉन घालून वॉर्ड क्र. २२च्या समोर फिरत होता. याचवेळी वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. रमेश पराते व मेडिकलचे जनसंपर्क अधिकारी डॉ. गिरीश भोयर राऊंड मारीत असताना राहुलच्या हालचालीवर संशय आला. त्यांनी त्याला जवळ बोलवून विचारणा केली. राहुलच्या गळ्यात ओळखपत्रही होते. त्याची चौकशी केली असताना राहुल उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. संशय अधिक बळावताच त्यांनी अधीक्षक कक्षाकडे चलण्यास सांगितले. त्याचवेळी राहुल पळायला लागला. डॉक्टरांनी आरडाओरड केली. सुरक्षा रक्षकांनी त्याचा पाठलाग केला असताना नागरिकांनी राहुलला पकडले आणि मेडिकल प्रशासनाच्या स्वाधीन केले. प्रशासनाने लागलीच अजनी पोलिसांना बोलावून बोगस डॉक्टर राहुलला पोलिसांच्या स्वाधीन केले. शुक्रवारी मेडिकल प्रशासनाकडून तक्रार करण्यात आलेली नव्हती. शनिवारी डॉ. भोयर यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी)