शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या वित्त विभागाला 'कॅफो' मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 19:55 IST

महापालिकेतील प्रमुख लेखा व वित्त अधिकारी पदावरून मदन गाडगे दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर अद्याप या पदावर पूर्णवेळ लेखा व वित्त अधिकारी मिळालेला नाही.

ठळक मुद्देअतिरिक्त प्रभारावर कारभार: रिक्तपदामुळे कामाचा बोजा वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेतील प्रमुख लेखा व वित्त अधिकारी पदावरून मदन गाडगे दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर अद्याप या पदावर पूर्णवेळ लेखा व वित्त अधिकारी मिळालेला नाही. अतिरिक्त प्रभारावर कामकाज सुरू आहे. राजस्व लेखा परीक्षक मोना ठाकूर, उपायुक्त नितीन कापडणीस, अपर आयुक्त अझीझ शेख आदींनी अतिरिक्त प्रभार सांभाळला. अझीझ शेख यांची बदली झाल्याने आता उपायुक्त राजेश मोहिते यांच्याकडे याविभागाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.वित्त विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. महापालिकेला आर्थिक शिस्त व महत्त्वाच्या फाईलचा निपटारा करण्याची जबाबदारी या विभागावर आहे. असे असूनही विभागाला पूर्णवेळ कॅफो मिळत नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहे. त्यातच या विभागात मोठ्याप्रमाणात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. अतिरिक्त जबाबदारीमुळे कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे. याचा कामकाजावरही परिणाम झाला आहे. या विभागातील अनेक कर्मचाऱ्यांची अन्य विभागात बदली करण्यात आली. काही कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्त झाले. परंतु त्यांच्या जागेवर नवीन कर्मचारी व अधिकारी आलेले नाही.रिक्तपदामुळे एकाच कर्मचाऱ्याला धनादेश काढावा लागतो, तोच नोंदी घेतो व अन्य जबाबदारी सांभाळतो. यामुळे कंत्राटदारांची बिले वेळेवर मंजूर होत नाही. फाईल टेबलावर पडून राहतात, अशी कंत्राटदारांची तक्रार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी या विभागातील कर्मचारी निवडणुकीच्या कामात होते. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या कामाला या विभागातील कर्मचारी लागले आहे. त्यामुळे विभागात शुकशुकाट आहे. कामासाठी येणाऱ्यांना कर्मचारी व अधिकारी मिळत नाही. याचा आर्थिक व्यवहारावर परिणाम होत आहे.मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. ऑगस्ट महिन्याचे वेतन देयक सातव्या वेतन आयोगानुसार बनविण्याचे निर्देश दिले आहे. रिक्तपदामुळे या कामावरही परिणाम झाला आहे. वेतन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांत नाराजी आहे.बिलासाठी कंत्राटदारांच्या चकरामहापालिकेच्या कंत्राटदारांना २० तारखेपर्यंत बिले द्यावी लागतात. परंतु, कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कंत्राटदार व कर्मचारी त्यांची बिले वेळेत मंजूर होत नाही. एका कामासाठी अनेकदा चकरा माराव्या लागतात. अशी कंत्राटदारांची ओरड आहे. फाईल तातडीने निकाली निघावी यासाठी नगरसेवक स्वत: फाईल घेऊ न या विभागात जातात. मात्र कर्मचारी भेटत नसल्याने त्यांनाही चकरा माराव्या लागतात.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका