मनपाने १४८ नागरिकांना दंड करून दिले मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:12 IST2020-12-02T04:12:38+5:302020-12-02T04:12:38+5:30

आतापर्यंत २२,१२७ व्यक्तींविरुद्ध कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १४८ ...

Municipal Corporation fined 148 citizens with masks | मनपाने १४८ नागरिकांना दंड करून दिले मास्क

मनपाने १४८ नागरिकांना दंड करून दिले मास्क

आतापर्यंत २२,१२७ व्यक्तींविरुद्ध कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १४८ नागरिकांकडून ५०० रुपये याप्रमाणे ७४ हजार रुपयाचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क देण्यात आले. मागील काही दिवसात शोध पथकांनी २२,१२७ नागरिकांविरुद्ध कारवाई करून ९४ लाख २२ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका अद्याप टळला नाही. असे असूनही अनेक नागरिक विनामास्क फिरतात. ही बाब घातक असल्याने अशा नागरिकांवर कारवाई केली जात आहे, तसेच त्यांना मास्क देण्यात येत आहे.

मंगळवारी उपद्रव शोध पथकाद्वारे लक्ष्मीनगर झोनअंतर्गत २४, धरमपेठ २०, हनुमाननगर २१, धंतोली ११, नेहरूनगर ९, गांधीबाग ९, सतरंजीपुरा १०, लकडगंज ८, आशीनगर १६, मंगळवारी झोनअंतर्गत १८ आणि मनपा मुख्यालयात २ जणांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली.

शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत ९४ लाख २२ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

नागरिकांनी मास्क लावून आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा करावी, असेही आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Municipal Corporation fined 148 citizens with masks