शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:06 IST

नागपूर : वापरलेल्या विजेच्या देयकापोटी आलेल्या रकमेचा भरणा न करता महावितरण कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन वीज ग्राहकांच्या ...

नागपूर : वापरलेल्या विजेच्या देयकापोटी आलेल्या रकमेचा भरणा न करता महावितरण कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन वीज ग्राहकांच्या विरोधात वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी खरबी वितरण केंद्र येथील सहायक अभियंता हरीश मुंगसे आपले सहकारी तंत्रज्ञ असिफ शेख, तंत्रज्ञ खोडे, उच्चस्तर लिपिक काकडे यांच्यासोबत बाबा ताजनगर, शारदा सोसायटी परिसरात थकबाकीदार वीज ग्राहकाकडून वीजबिल वसुली करत होते. थकबाकीदार वीजग्राहक शब्बीर शेख व शहजाद अली यांच्याकडे गेले असता दोन्ही वीज ग्राहकांनी यांनी मागील १८ महिन्यांपासून बिल भरले नव्हते. या थकबाकीदार वीजग्राहकाकडे अनुक्रमे २७,००० आणि ३१,००० रुपयांची थकबाकी होती. महावितरणकडून थकबाकी भरण्याची विनंती केली असता थकबाकीदार ग्राहकांनी सहकार्य करण्यास नकार दिला. अखेर नाईलाजाने महावितरणच्या जनमित्रांनी थकबाकीदार वीजग्राहक शब्बीर शेख व शहजाद अली

दोघांचा वीजपुरवठा कापला. थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केला म्हणून दोघांनी परिसरातील लोकांना जमा करून महावितरणच्या पथकास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून व मारण्याची धमकी दिली. महावितरणच्या लिपिक श्रीमती खोडे यांचा मोबाइल हिसकावला. सदर बाबत तातडीने पोलीस यांना सूचना देण्यात आली, त्यांनी आरोपीना उचलून वाठोडा पोलीस स्टेशन मधे आणले. दोन्ही आरोपी वर कलम ५०४,५०६, प्रतिबंधक कायदा कलम १०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करतेवेळी महावितरणच्या काँग्रेसनगर विभागाचे कार्यकारी अभियंता हेमराज ढोके, उपकार्यकारी अभियंते संजय मते उपस्थित होते. पोलीस अधिक तपास करीत आहेत.