शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
2
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
3
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
4
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
5
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
6
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
7
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
8
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
9
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
10
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
11
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
12
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
13
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
14
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
15
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
16
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
17
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
18
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
19
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
20
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
Daily Top 2Weekly Top 5

मुलावरील लैंगिक छळाविरुद्ध मातेची याचिका

By admin | Updated: July 12, 2014 02:26 IST

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या व्यक्तीकडून आपल्या सात वर्षीय मुलाचा करण्यात आलेल्या लैंगिक छळाविरुद्ध एका मातेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर..

नागपूर : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या व्यक्तीकडून आपल्या सात वर्षीय मुलाचा करण्यात आलेल्या लैंगिक छळाविरुद्ध एका मातेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल केली असून, या याचिकेवर न्यायालयाने प्रतिवादी सोनेगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला दोन आठवड्यात उत्तर मागविणारी नोटीस जारी केली आहे. या महिलेने याचिकेत धक्कादायक माहिती नमूद केली आहे. आपण मिलिंद भोळे नावाच्या व्यक्तीसोबत राहत असताना तो आपल्या सात वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करीत होता. या दृश्याचे चित्रीकरण आपण खुद्द आपल्या मोबाईलने केले. प्रारंभी भोळे हा आपणास आणि मुलाला खोलीत डांबून ठेवून कामानिमित्त निघून जायचा. त्यानंतर तो घरात विवस्त्रस्थितीत वावरायचा, त्यानंतर त्याने वारंवार आपल्या या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचारास सुरुवात केली. या असहाय दृश्याचे आपण चित्रीकरण करून २९ एप्रिल २०१४ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार केली असता, आपली तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. पोलीस निरीक्षक शाह यांनी हे दृश्य पाहून असा प्रकार विदेशा सामान्य आहे, तुम्ही समझोता करून टाका, तुम्हाला मदत करतो, असे म्हटले होते. ५ जून रोजी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करूनही या अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केला नव्हता. ही बाब वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच सोनेगाव पोलिसांनी ६ जून रोजी मिलिंद भोळे याच्याविरुद्ध लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण या कायद्यांतर्गत तब्बल दीड महिन्यानंतर गुन्हा दाखल केला. परंतु अद्यापही आरोपीला अटक केली नाही. आरोपीची आणि अत्याचारग्रस्त आपल्या मुलाची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नाही. सोनेगाव पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासाचा अहवाल मागविण्यात यावा, पोलीस निरीक्षकाकडून हा तपास काढून अन्य कोणत्याही अधिकाऱ्याकडे तपास सोपविण्यात यावा, आरोपीला ताबडतोब अटक करण्याचे निर्देश द्यावे, बालकांविरुद्ध होणाऱ्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, राज्यात सर्वत्र या कायद्याचे काटेकोर पालन होण्याच्या संदर्भात पोलीस महानिरीक्षकांना निर्देश देण्यात यावे, अशी प्रार्थनाही या मातेने केली आहे. न्यायालयात याचिकाकर्त्या मातेच्यावतीने अ‍ॅड. स्मिता सरोदे सिंगलकर आणि अ‍ॅड. असीम सरोदे काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)