काेराेना संक्रमणासाेबत मृत्यूदरही वाढताेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:08 AM2021-04-19T04:08:37+5:302021-04-19T04:08:37+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर/उमरेड/हिंगणा/नरखेड/रामटेक : नागपूर शहरासह जिल्ह्यात रविवारी (दि. १८) २६,७९२ नागरिकांची काेराेना टेस्ट करण्यात आली असून, यातील ...

Mortality also increases with carotid infections | काेराेना संक्रमणासाेबत मृत्यूदरही वाढताेय

काेराेना संक्रमणासाेबत मृत्यूदरही वाढताेय

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर/उमरेड/हिंगणा/नरखेड/रामटेक : नागपूर शहरासह जिल्ह्यात रविवारी (दि. १८) २६,७९२ नागरिकांची काेराेना टेस्ट करण्यात आली असून, यातील ७,१०७ जणांना काेराेनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील ३,९८७ रुग्ण काेराेनामुक्त झाले असून, ८५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक संक्रमण कळमेश्वर तालुक्यात आढळून आले असून, या तालुक्यात १०७ रुग्ण आढळून आले आहेत. उमरेड तालुक्यात ७० तर हिंगण्यामध्ये ४७, नरखेड तालुक्यात ३० आणि रामटेक तालुक्यात १६ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. कळमेश्वर तालुक्यात रविवारी १०७ नागरिकांना काेराेनाची लागण झाल्याचे आढळून आले. यात कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील १६ आणि ग्रामीण भागातील ९१ रुग्ण आहेत. उमरेड शहरासह तालुक्यात रविवारी ७० नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. यात उमरेड शहरातील ४७ तर ग्रामीण भागातील २३ रुग्णांचा समावेश आहे.

हिंगणा तालुक्यात रविवारी ४७ रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात तालुक्यातील वानाडोंगरीत शहरातील २८, टाकळघाट व हिंगणा येथील प्रत्येकी ४, नीलडोह येथील २, डिगडोह, पिपरी, गिदमगड, गौताळा, डिगडोह (पांडे), सुकळी (कलार), वडधामणा, उमरी (वाघ) व मोंढा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यातील काेराेना रुग्णांची एकूण संख्या ८,९१० झाली असून, यातील ५,७०२ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे.

नरखेड तालुक्यात ३० रुग्ण आढळून आले. यात १२ रुग्ण नरखेड शहरातील तर १८ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. सध्या तालुक्यात १,८५७ ॲक्टिव्ह रुग्ण असून, यात ग्रामीण भागातील १,६०४ ॲक्टिव्ह रुग्ण तर शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २५३ आहे. नव्याने पाॅझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये सावरगाव प्राथमिक आराेग्य केंद्रातील गावांमधील चार, जलालखेडा प्राथमिक आराेग्य केंद्रातील गावांमधील १, मेंढला प्राथमिक आराेग्य केंद्रातील गावांमधील १० आणि मोवाड प्राथमिक आराेग्य केंद्रातील गावांमधील ३ रुग्णांचा समावेश आहे.

रामटेक तालुक्यात १६ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात रामटेक शहरातील १६ रुग्ण असून, ग्रामीण भागात एकाही नवीन रुग्णाची नाेंद करण्यात आली नाही. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ४,३३८ झाली असून, यातील १,८१९ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के व तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. चेतन नाईकवार यांनी संयुक्तरीत्या दिली.

Web Title: Mortality also increases with carotid infections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.