शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक छळाच्याच तक्रारी अधिक

By admin | Updated: September 7, 2014 00:55 IST

महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये महिलांच्या लैंगिक छळांच्या तक्रारींचे प्रमाण अधिक असल्याचे सुनावणीदरम्यान दिसून आले आहे. यात सरकारी अधिकाऱ्यांकडून आणि खाजगी कंपन्यांमधील तक्रारींचा समावेश आहे.

महिला आयोग सुनावणी : २० तक्रारींचा निपटारानागपूर : महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये महिलांच्या लैंगिक छळांच्या तक्रारींचे प्रमाण अधिक असल्याचे सुनावणीदरम्यान दिसून आले आहे. यात सरकारी अधिकाऱ्यांकडून आणि खाजगी कंपन्यांमधील तक्रारींचा समावेश आहे.‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत दर महिन्याला आयोगाकडून नागपुरात सुनावणी होते. त्यानुसार शनिवारी नागपूरमधील रविभवनात आयोगाच्या सदस्य अ‍ॅड. विजया बांगडे यांच्या उपस्थितीत महिलांच्या तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली. सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत चाललेल्या सुनावणीदरम्यान आयोगाकडे एकूण ४० तक्रारींचा समावेश होता. यापैकी जुन्या २० तक्रारींवर समेट घडवून आणण्यात आला. महिलांना मुंबईला जाणे शक्य नसते.त्यामुळे नागपूरमध्ये सुनावणी घेतली जाते. त्यामुळे महिलांच्या तक्रारींचे प्रमाण खूप वाढले आहे. विशेषत: सरकारी कार्यालयात आणि खाजगी कंपन्यांमध्ये वरिष्ठांकडून होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींचे प्रमाण यात अधिक असल्याचे बांगडे यांनी स्पष्ट केले. शनिवारी प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये एक बीडीओ आणि शिक्षण अधिकाऱ्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार आली. एका बड्या खाजगी कंपनीतील महिलांनीही आयोगाकडे याच मुद्यावर दाद मागितली होती. कंपनीला यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. कंपनीचे अधिकारी सुनावणीदरम्यान उपस्थित होते. त्यांनी महिलांना पुरेशी सुरक्षा प्रदान करण्याची हमी दिली.कौटुंबिक वादातून विभक्त झालेले दोन दाम्पत्य आयोगाने त्यांच्यात समेट घडवून आणल्याने आनंदीत होते. संसाराची गाडी नव्याने सुखाच्या वाटेवर आल्याबद्दल हे दाम्पत्य शनिवारी बांगडे यांना भेटले व कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विभागीय समन्वयक प्रतिभा गजभिये, आयोगाच्या समुपदेशक वैशाली केळकर, परिणीती बालपांडे, ए.डी. चांदूरकर, विधी सल्लागार अमिता खोब्रागडे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे, समन्वयक एस.एम. बोंडे, अनिल रेवतकर उपस्थित होते.(प्रतिनिधी)