शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

आॅगस्टमध्ये मान्सून मंदावला

By admin | Updated: August 15, 2016 01:41 IST

सामान्यपणे आॅगस्ट महिन्यात जुलैप्रमाणेच जोरदार पाऊस होतो. मात्र यावेळी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच मान्सूनची सक्रियता कमी झाली आहे.

१४ दिवसात फक्त ७५.४ मिमी पाऊस नागपूर : सामान्यपणे आॅगस्ट महिन्यात जुलैप्रमाणेच जोरदार पाऊस होतो. मात्र यावेळी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच मान्सूनची सक्रियता कमी झाली आहे. १ ते १४ आॅगस्ट दरम्यान नागपुरात फक्त ७५.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आॅगस्टमध्ये साधारणत: सरासरी २७६.५ मिमी पाऊस पडतो. मात्र, यावर्षी आॅगस्टचा अर्धा महिना होऊनही पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही. रविवारी दिवसभर आकाशात ढगांची गर्दी होती. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. सायंकाळीही काही भागात हलका पाऊस झाला. मात्र, जोराचा पाऊस कोसळलाच नाही. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवडाभर मान्सूनची चाल अशीच संथ असेल. विदर्भातील काही भागात पाऊस पडू शकतो. मात्र, त्याची तीव्रता फारशी नसेल. विदर्भ व छत्तीसगडमध्ये मान्सूनची सक्रियता कमी झाली आहे. बिहार, उत्तर प्रदेश व आसपासच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे या भागात चांगला पाऊस पडू शकतो. नागपूरच्या आकाशात ढगांची गर्दी आहे. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळत आहे. असे असले तरी पाऊस न झाल्याने किमान व कमाल तापमान एक अंशांनी वाढले आहे. कमाल तापमान ३१.२ अंश तर किमान तापमान २४.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. तसे पाहिले तर जुलैमध्येही सुरुवातीला मान्सून शांत होता. मात्र, दुसऱ्या आठवड्यानंतर जोर धरला व पूर्ण अनुशेष भरून निघाला. तसेच काही आॅगस्टच्या शेवटी होईल, अशी अपेक्षा आहे. १९ जून रोजी नागपुरात मान्सून धडकला होता. आजवर ६२९.७ मिमी पाऊस झाला आहे. या काळातील एरव्हीची सरासरी ६०३.४ मिमी आहे. ही आकडेवारी पाहता सरासरीपेक्षा ४ टक्के अधिक पाऊस पडला आहे. संपूर्ण विदर्भात आजवर ७५८.५ मिमी पाऊस झाला आहे. विदर्भात सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पाऊस झाला आहे. भंडारा जिल्ह्यात मात्र पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. (प्रतिनिधी)