शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील मोमिनपुरा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 12:45 IST

महापालिके च्या प्रभाग क्रमांक ८ मधील तकिया दिवाणशहा मोमिनपुरा परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. शहरातील नागरिकांचे हित विचारात घेता महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.

ठळक मुद्देमनपा आयुक्तांचा आदेशपरिसरातीलरस्ते सीलकोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खबरदारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिके च्या प्रभाग क्रमांक ८ मधील तकिया दिवाणशहा मोमिनपुरा परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये, याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तसेच शहरातील नागरिकांचे हित विचारात घेता महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्चपासून लागू केला आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार आयुक्तांनी अधिसूचना निर्गमित केली आहे.महाराष्ट्र कोविड-१९, उपाययोजना नियम २०२० यातील नियम ३ नुसार शहरी भागात महापालिका आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात कोविड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार आयुक्तांनी आदेश निर्गमित केले आहे.घोषित प्रतिबंधित क्षेत्रात तकिया दिवाणशहा मोमिनपुरा या भागातील निश्चित केलेल्या कॅन्टोनमेंट एरियानुसार उत्तर पूर्वेस-तीन खंबा चौक, दक्षिण पूर्वेस नालसाब चौक, दक्षिण-पश्चिम भगवाघर चौक, पश्चिमेस जामा मशीद व उत्तर पश्चिमेस मोमिनपुरा चौक प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या भागात येणारे सर्व रस्ते सील करण्यात आले असून रहदारी बंद करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी तसेच सर्व संबंधितांकडून सोशल डिस्टन्सिंगबाबत नियमांचे पालन करावे. मनपा आरोग्य अधिकारी यांना या भागात आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत......बंदीतून वगळण्यात आलेल्या बाबीशासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत कर्मचारी व अधिकारीआवश्यक तातडीची वैद्यकीय सेवा तसेच अंत्यविधी.वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथालॉजिस्ट इत्यादी.जीवनावश्यक वस्तूंचा सेवा पुरवठा करणारे व्यक्ती (पोलीस विभागामार्फत पास प्राप्त धारक)

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस