धावत्या रेल्वेत विद्यार्थिनीशी अश्लील चाळे : त्रिशताब्दी एक्स्प्रेसमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:04 AM2019-08-06T00:04:14+5:302019-08-06T00:05:14+5:30

झोपेत असलेल्या एका विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याची घटना सोमवारी सकाळी त्रिशताब्दी एक्स्प्रेसमध्ये घडली. गाडी नागपुरात पोहोचल्यानंतर पिडितेच्या संतापलेल्या नातेवाईकांनी आरोपीची धुलाई करून त्यास लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास आमला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Molestation with student on the running train: Incident in the Trishatabdi Express | धावत्या रेल्वेत विद्यार्थिनीशी अश्लील चाळे : त्रिशताब्दी एक्स्प्रेसमधील घटना

धावत्या रेल्वेत विद्यार्थिनीशी अश्लील चाळे : त्रिशताब्दी एक्स्प्रेसमधील घटना

Next
ठळक मुद्देलोहमार्ग पोलिस ठाण्यात गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झोपेत असलेल्या एका विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याची घटना सोमवारी सकाळी त्रिशताब्दी एक्स्प्रेसमध्ये घडली. गाडी नागपुरात पोहोचल्यानंतर पिडितेच्या संतापलेल्या नातेवाईकांनी आरोपीची धुलाई करून त्यास लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास आमला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
मधून अनिल कासवा (२४) रा. गांधी वॉर्ड, हिंगणघाट असे अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याचे लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत. हिंगणघाट येथे त्याचा कापडाचा व्यवसाय आहे. तर पीडित विद्यार्थिनी नागपुरातील रहिवासी असून ती बीएसस्सीला शिकते. काही दिवसांपूर्वी मधूर त्याच्या कुटुंबीयांसह उज्जैन येथे दर्शनासाठी गेला होता. यावेळी कासवा कुटुंबातील जवळपास ५० लोक होते. परतीच्या प्रवासात १२९१३ त्रिशताब्दी एक्स्प्रेसने नागपुरला परत येत होते. मधूर हा बी-१ कोचमध्ये प्रवास करीत होता. तर पीडित विद्यार्थिनीही त्याच कोचमध्ये होती. ती एकटी असल्याची संधी साधून मधूरची वाईट नजर तिच्यावर गेली. बराच वेळ तो तिच्याकडे वाईट नजरेने बघत होता. त्याच्या घाणेरड्या प्रकारामुळे ती त्रासली होती. परंतु ती एकटी असल्याने त्याला विरोध करु शकली नाही. त्यामुळे आरोपीची हिंमत वाढली. ती झोपी गेल्यानंतर आरोपीने तिच्याशी अश्लील चाळे केले. हा प्रकार बैतुल ते आमला दरम्यान सकाळी ७ ते ७.३० वाजताच्या सुमारास घडला. विद्यार्थिनीने आरडाओरड केल्यामुळे इतर प्रवासी आणि गाडीतील जवान कोचमध्ये पोहोचले. या प्रकारामुळे कोचमधील प्रवाशीही संतप्त झाले. परंतु आरोपीसोबत असलेल्या नातेवाईकांची संख्या अधिक असल्यामुळे प्रवाशी शांत झाले. घटनेची माहिती लोहमार्ग पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. तसेच पीडित विद्यार्थिनीने नातेवाईकांना कळविले. त्रिशताब्दी एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ५ वर सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास पोहोचणार असल्याने तिचे नातेवाईक आधीच पोहोचले. मधूरला लोहमार्ग ठाण्यात आणत असतानाच पीडितेच्या नातेवाईकांनी त्याची चांगलीच धुलाई केली. हेड कॉन्स्टेबल श्रीकृष्ण पवार यांनी त्याच्याविरूध्द कलम ३५४ अंतर्गत गुन्हा नोंदविला. त्यानंतर पोलीस त्याला आमला येथे घेऊन गेले. हे प्रकरण हेड कॉन्स्टेबल ऑजवेल्ड थॉमस यांनी हाताळले.
लोहमार्ग पोलीस ठाण्यासमोर गोंधळ
आरोपीला लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याचे ५० नातेवाईक आणि पिडीत विद्यार्थिनीचे नातेवाईक लोहमार्ग पोलीस ठाण्यासमोर जमा झाले. बराच वेळपर्यंत त्यांच्यात वाद सुरु होता. प्रकरण मिटविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु पोलीस निरीक्षक वासुदेव डाबरे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यामुळे सर्वजण शांत झाले. यात गुन्हा दाखल झाल्यानंतरही नागपूर विभागातील दोन टीसी या प्रकरणात मध्यस्थी करीत होते. त्यांनी फिर्यादीला भेटुन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. यात एका महिला टीसीचा समावेश होता. एका विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याच्या प्रकरणात टीसींनी मध्यस्थी केल्यामुळे लोहमार्ग पोलीसांनीही आश्चर्य व्यक्त केले.

Web Title: Molestation with student on the running train: Incident in the Trishatabdi Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.