शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदी’ नंबर प्लेटचे फॅड!

By admin | Updated: May 18, 2014 00:52 IST

वाहनांवर नंबर टाकताना तो एका विशिष्ट आकारात टाकण्यात यावा, असा नियम आहे, मात्र याकडे वाहनधारक दुर्लक्ष करतात.

 आरटीओ, वाहतूक पोलीस : कारवाई करतील काय?

 नागपूर : वाहनांवर नंबर टाकताना तो एका विशिष्ट आकारात टाकण्यात यावा, असा नियम आहे, मात्र याकडे वाहनधारक दुर्लक्ष करतात. त्यामुळे अंकांतून दादा, मामा, काका, राम अशी अक्षरे नंबरप्लेटवर झळकतात. आता यात ‘मोदी’ नावाचीही भर पडली आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या विजयी रॅलीमध्ये या नंबर प्लेटची मोटारसायकल सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. शहरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पूर्व, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहर आणि ग्रामीण आरटीओ कार्यालयातून दिवसाकाठी साधारण पन्नासच्यावर नव्या मोटारसायकलची नोंद होते. परंतु वाहनाच्या नंबर प्लेटवर नंबर लिहून देणार्‍यांना मात्र, आरटीओ किंवा वाहतूक पोलिसांकडून सूचना, मार्गदर्शन केले जात नाही. सोबतच विचित्र नंबर टाकून देणार्‍यांवर कारवाई होत नाही. त्यामुळे चित्रविचित्र नंबर प्लेट तयार करून घेण्याचे फॅड वाढले आहे. उपराजधानीत सुमारे दोन हजारावर अशा विचित्र नंबरप्लेट असलेली वाहने रस्त्यावरून बिनधास्त धावत आहेत. विशेष म्हणजे चौकाचौकात उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांनी मोटार व्हेईकल अ‍ॅक्टच्या कलम ५० (१) (१७७) नुसार दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु कठोर कारवाईच होत नसल्याने आणि फक्त १०० रुपये दंड असल्याने अशा नंबर प्लेटचे फॅड वाढत आहे. शुक्रवारी गडकरी यांच्या विजयी रॅलीमध्ये ‘मोदी’ नंबर प्लेटची मोटारसायकल सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. ४७४९ या इंग्रजी अंकातून वाहनधारकाने ‘मोदी’ नाव साकारले. याला पाहून अनेक वाहनधारकाच्या नंबर प्लेटवर ‘मोदी’ झळकण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) हे आहेत नियम दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने आदी वर्गवारीनुसार वाहनाचे नंबर कसे असावेत, त्यांचा आकार कसा असावा, याबाबत निश्चित नियम आहेत. दुचाकी वाहनांवर नंबर टाकताना समोरच्या नंबर प्लेटवरील अक्षरे व अंकांची जाडी पाच मिलिमीटर तर उंची ३० मिलिमीटर असावी. दोन अक्षरांमधील अंतर हे पाच मिलिमीटर असावे. मागील नंबर प्लेटवरील अक्षरे व अंकांची जाडी सात मिलिमीटर, उंची ३५ मिलिमीटर असावी. चारचाकी वाहनांच्या पुढील व मागील नंबर प्लेटवरील अक्षरे व अंकांची जाडी १० मिलिमीटर, उंची ६५ मिलिमीटर असावी. दोन अक्षरांमधील अंतर हे १० मिलिमीटर असावे, असा नियम आहे, मात्र या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसून येत नाही.