शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

मोक्षधाम रेल्वे ओव्हरब्रीजची स्लॅब कोसळली

By admin | Updated: October 24, 2016 02:46 IST

मागील अनेक वर्षांपासून मोक्षधाम येथील रेल्वे ओव्हरब्रीजला अवकळा प्राप्त झाली आहे.

धोक्याची घंटा : पूर्ण पूल कोसळल्यावर प्रशासनाला जाग येणार काय?नागपूर : मागील अनेक वर्षांपासून मोक्षधाम येथील रेल्वे ओव्हरब्रीजला अवकळा प्राप्त झाली आहे. रविवारी तर या पुलाचा काही भाग कोसळून खाली पडला. परंतु या गंभीर बाबीकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे हा पूल कोसळून जीवितहानी झाल्यावरच रेल्वे प्रशासनाला जाग येणार काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या पुलाच्या स्थितीबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला आहे.मोक्षधाम घाटाजवळ रेल्वेचा ओव्हरब्रीज आहे. या ओव्हरब्रीजला अवकळा प्राप्त झाली आहे. या पुलाखालून दिवसाकाठी हजारो नागरिक, बसगाड्या, दुचाकीस्वार, पादचारी ये-जा करतात. हा पूल कोसळल्यास जीवितहानी होण्याची मोठी शक्यता आहे. या पुलावरून जाणाऱ्या रेल्वेगाड्यातील शौचालयाचे पाणी वाहनचालकांच्या अंगावर टपकते. रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत अनेकदा या पुलाची डागडुजी केली. परंतु त्यावर कायमचा तोडगा काढण्यात रेल्वे प्रशासनाला अपयश आले. या पुलावरून दिवसाकाठी १०० ते १२५ रेल्वेगाड्या ये-जा करतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास कोणत्याही क्षणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. हावडा-मुंबई मार्गावर असलेला हा पूल कोसळल्यास रेल्वे वाहतूक विस्कळीत होऊन त्याचा मोठा परिणाम रेल्वे प्रवाशांवर होणार आहे. त्यामुळे कोसळत चाललेल्या या पुलाची त्वरित डागडुजी करून रेल्वे प्रशासनाने नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)