शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

विदर्भात पक्ष बांधणीवर मनसेचा फोकस; देशपांडे, जाधव, उंबरकर यांनी नागपुरात घेतला आढावा

By कमलेश वानखेडे | Updated: June 20, 2023 14:22 IST

बाळासाहेब ठाकरे असताना शिवसैनिक हे थेट पुढून हल्ला करायचे. आता मात्र ते मागून हल्ला करतात, अशी टीका देशपांडे यांनी केली.

नागपूर : मनसेने मोठ्या प्रमाणात पक्ष संघटनेत फेरबदल केले आहेत. येत्या काळात विदर्भात पक्ष बांधणीवर लक्ष दिले जात आहे. आगामी काळातील सर्व निवडणुका मनसे लढणार असून किती जागा लढायच्या हे वेळेवर ठरवू, असे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

मनसेच्या पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर संदीप देशपांडे, अविनाश जाधव व राजू उंबरकर यांचे मंगळवारी नागपुरात आगमन झाले. नागपूर शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून त्यांनी पक्ष बांधणीचा आढावा घेतला. बैठकीला शहर अध्यक्ष विशाल बडगे व चंदू लाडे उपस्थित होते. यावेळी देशपांडे म्हणाले, विदर्भात काही लोक वर्षानुवर्षे पदावर होते. आता मात्र नवीन उत्साही टीम आल्याने जुने पदाधिकारी राजीनामा देत आहेत. यामुळे पक्षाचे कुठलेही नुकसान नाही. राज्यात महापालिका निवडणूका कधी होईल हे ब्रह्मदेवालाच माहीत, असेही त्यांनी सांगितले. आज गद्दार दिन साजरा होत आहे, तो त्या दोन पक्षाचा अंतर्गत वाद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांचे ठाणे येथे भावी पंतप्रधान होर्डिंग लागले, याची खिल्ली उडवत भविष्यात आपल्याकडे अमेरिकेचे भावी पंतप्रधान असे होर्डिंग लागेल. रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष आहे, उद्या ते पण एखादे होर्डिंग लावतील, असा टोला त्यांनी लगावला.

शिवसैनिक आता मागून हल्ला करतात

बाळासाहेब ठाकरे असताना शिवसैनिक हे थेट पुढून हल्ला करायचे. आता मात्र ते मागून हल्ला करतात, अशी टीका देशपांडे यांनी केली. आपल्यावरील हल्ल्याचा कट हा चेंबूरला निलेश पराडकर यांच्या ऑफिसमध्ये रचला गेला, असा आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख आहे. निलेश पराडकर शिवसेना (ठाकरे गट) माथाडी कामगार पदाधिकारी आहे. तो सुनील राऊत आणि संजय राऊत यांच्या जवळचा माणूस आहे. निलेश पराडकर आता फरार असून त्याला अटक होईल त्यावेळी कोणाच्या सांगण्यावरून हा हल्ला झाला हे स्पष्ट होईल. उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी हा हल्ला केला गेला असे आरोपी कबूल करतात. ही राजकीय पार्श्वभूमी नाही तर कुठली पार्श्वभूमी आहे, असा सवालही त्यांनी केला. ठाकरेंकडे कार्यकर्ते उरले नाहीत त्यामुळे गँगस्टर पकडायचे. त्यांना सुपारी द्यायच्या आणि असे धंदे करायचे, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणSandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसेnagpurनागपूरAvinash Jadhavअविनाश जाधवVidarbhaविदर्भ