शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीत चूक! तब्बल १९५ वाहनांवर कारवाई
By सुमेध वाघमार | Updated: July 17, 2025 19:21 IST2025-07-17T19:19:47+5:302025-07-17T19:21:47+5:30
आरटीओची विशेष मोहिम : सात दिवसांत ९ लाखांवर दंड वसूल

Mistake in school student transportation! Action taken against 195 vehicles
सुमेध वाघमारे
नागपूर: विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (ंआरटीओ) स्कूल बस, व्हॅन, आॅटो रिक्षांसह इतरही विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. गेल्या सात दिवसांत तब्बल १९५ वाहनांवर कारवाई करत ९ लाख ७८ हजार रुपयांचा दंड दोषी वाहनांकडून वसूल करण्यात आला आहे. या आकडेवारीवरून शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीत मोठ्या प्रमाणात चुका होत असल्याचे समोर आले आहे.
नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्याने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनांची संख्या वाढली आहे. नागपूर शहरात जवळपास २ हजार १९१ नोंदणीकृत स्कूल बस आणि स्कूल व्हॅन आहेत. याशिवाय आॅटो रिक्षा, ई-रिक्षा आणि खाजगी वाहनांचाही विद्यार्थी वाहतुकीसाठी वापर केला जातो. याच पार्श्वभूमीवर, काही रिक्षाचालकांकडून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक होत असल्याच्या तक्रारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) मिळाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत, प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (शहर) आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (पूर्व) यांनी ७ जुलै २०२५ पासून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनांची विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
दोषी वाहनांमध्ये ६० स्कूल बस, व्हॅनचा समावेश
या तपासणी मोहिमेत दोषी आढळलेल्या वाहनांमध्ये स्कूल बस आणि स्कूल व्हॅनची संख्या ६० असून त्यांच्याकडून ५ लाख ५० हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. याशिवाय, ३८ खाजगी वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३ लाख ४० हजार रुपये, ८२ आॅटो रिक्षाचालकांकडून ८६ हजार रुपये तर १५ ई-रिक्षा चालकांकडून २ हजार रुपये असा एकूण १९५ वाहनांकडून ९ लाख ७८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
आॅटोरिक्षात आठच्यावर विद्यार्थी
आॅटोरिक्षाची आसन क्षमता प्रौढांसाठी तीन आहे. मात्र, आरटीओच्या पथकाच्या तपासणीत एका आॅटोरिक्षांमध्ये आठपेक्षा अधिक विद्यार्थी बसलेले आढळून आले. मोटार वाहन निरीक्षक तुषारी बोबडे, विशाल भोवते आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक केतन बरसागडे व कुणाल कुथे यांनी ही कारवाई केली..
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला प्राधान्य द्या
"स्कूल बस, स्कूल व्हॅन, आॅटोरिक्षा आणि इतरही वाहनांनी मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला प्राधान्य द्यावे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे."
- किरण बिडकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर