शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मिशन नायलॉन मांजा

By admin | Updated: January 2, 2016 08:37 IST

नायलॉन मांजा जप्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मिशन हाती घेतले आहे. या मिशन अंतर्गत इतवारी व शुक्रवारी

नागपूर : नायलॉन मांजा जप्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मिशन हाती घेतले आहे. या मिशन अंतर्गत इतवारी व शुक्रवारी परिसरातून ४० हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. याशिवाय विविध संस्थांनीही शुक्रवारी बडकस चौकात एकत्र येत चायनीज नायलॉन, ग्लास कोटेड व पक्क्या मांजाविरुद्ध निदर्शने करीत नायलॉन मांजाची होळी केली. जीवघेणा नायलॉन मांजा शहरात कुठेही विकल्या जात असेल तर तो जप्त करून कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पथके नेमली आहेत. ही पथके पुढील काही दिवस शहराच्या विविध भागात फिरून तपासणी करतील. तीळसंक्रांतीच्या काळात मोठ्या प्रमाणात पतंग उडविली जाते. आपली पतंग कटू नये म्हणून बरेच जण न तुटणारा नायलॉन मांजा वापरतात. याचा फायदा घेत विक्रेतेही नायलॉन मांजा विकून पैसे कमवितात. मात्र, हा घातक नायलॉन मांजा कुणाच्या जीवास कारणीभूत ठरू शकतो, याचा विचारही पतंग उडविणारे व विक्रेतेही करीत नाहीत. नायलॉन मांजाने गळा कापून मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी शहरात घडल्या आहेत. अनेकजण गंभीर जखमीही झाले आहेत. त्यामुळे या मांजावर निर्बंध घालण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासन नायलॉन मांजा विरोधात कारवाईसाठी सक्रिय झाले आहे. वाईल्ड लाईफ वेलफेयर सोसायटीच्या बॅनरखाली जॉइंट्स ग्रुप आॅफ आॅरेंज सिटी, पीपल फॉर अ‍ॅनिमल्स, आयसॉ, उज्ज्वल गोरक्षण, ग्रीन विजिल, सृष्टी, राधाकृष्ण सार्इंधाम गोशाळा, वाईल्ड-सर, बॅड बॉईज ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी बडकस चौकात चायनीज नायलॉन, ग्लास कोटेड व पक्का मांजाच्या विरोधात निदर्शने केली. या वेळी नायलॉन मांजाची होळी करण्यात आली. वाईल्ड लाईफ वेलफेयर सोसायटीचे पंकज बादुले यांनी सांगितले की, घातक मांजा विरोधात शहरातील नऊ संस्था एकत्र आल्या आहेत. बंदी असलेला चायनीज नायलॉन मांजाची बाजारात विक्री करताना आढळले तर या विरोधात सर्व संस्था तीव्र आंदोलन करतील. नितीश भांदककर म्हणाले, गेल्यावर्षी मांजामुळे ४५० पक्षी जखमी झाले होते. यापैकी काही पक्ष्यांचेच जीव वाचविण्यात यश आले. पीपल फॉर अनिमल्सचे मनोज ठक्कर म्हणाले, मांजामुळे झाडांवर घरटे करून राहणाऱ्या पक्ष्यांचाही मृत्यू होतो. आंदोलनात घानश्याम मेहता, सुबोध आचार्य, संकेत आंबेकर, कौस्तुभ चटर्जी, प्रमोद कानेटकर, करिश्मा गलानी आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)