शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित वकिलांना मदतीसाठी मिशन निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:11 IST

नागपूर : गेल्या दोन महिन्यात कोरोनामुळे नागपुरातील ४० ते ५० वकील व त्यांच्या कुटुंबीयांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे ...

नागपूर : गेल्या दोन महिन्यात कोरोनामुळे नागपुरातील ४० ते ५० वकील व त्यांच्या कुटुंबीयांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे विधिक्षेत्र हळहळले आहे़ भविष्यात अशा घटना टाळता याव्यात आणि या संकटकाळात प्रत्येक गरजू वकिलाला आवश्यक मदत मिळावी, याकरिता मिशन निर्धार उपक्रम सुरू करण्यात आला आहे़ सुमारे १०० वकिलांनी वकिलांसाठी सुरू केलेला हा उपक्रम आहे़

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवाचे सदस्य अ‍ॅड. पारिजात पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमांतर्गत जबाबदारीनिहाय विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत़ या समित्या गरजू वकिलांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, कोरोना चाचणी करण्यासाठी व त्याचा अहवाल तातडीने मागविण्यासाठी प्रयत्न करणे, रुग्णालयांमध्ये खाटांची उपलब्धता तपासून वकिलांना व त्यांच्या कुटुंबीयांना भरती करून घेण्यासाठी प्रयत्न करणे, ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करून देणे, ब्लड प्लाझ्मा मिळवून देणे, रक्तदाते उपलब्ध करून देणे, गृह उपचाराकरिता वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, आवश्यक औषधे उपलब्ध करून देणे, लसीकरणासाठी प्रोत्साहित करणे, घरी भोजन उपलब्ध करून देणे, सकारात्मक विचारांची पेरणी करणे इत्यादी कामे करणार आहेत़ प्रत्येक समितीमधील सदस्य व त्यांचे मोबाईल क्रमांक समाजमाध्यमांमार्फत सार्वजनिक करण्यात आहेत़ गरजू वकील त्याला आवश्यक असलेली मदत मिळविण्यासाठी संबंधित समितीमधील सदस्यांशी संपर्क साधत आहेत़ या उपक्रमामुळे वकिलांना मोठा दिलासा मिळाला आहे़