शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशातील अपघाताचा धसका

By admin | Updated: August 7, 2015 03:02 IST

मध्य प्रदेशातील हरदा येथे झालेल्या रेल्वे अपघाताचा धसका मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने घेतला आहे.

वेगावर नियंत्रण : नदीवरील बांधांची पाहणी, पुलांवर वॉचमनची ड्युटीनागपूर : मध्य प्रदेशातील हरदा येथे झालेल्या रेल्वे अपघाताचा धसका मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने घेतला आहे. रेल्वे रुळांना प्रभावित करणाऱ्या नदीवरील बांधांची मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे पाहणी करण्यात येत आहे. अभियांत्रिकी आणि सिंचन विभागाचे अधिकारी या बांधांची माहिती घेत असून राज्य शासनालाही बांधावरून पाणी सोडण्यापूर्वी पूर्वसूचना देण्याबाबत कळविण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सर्व रेल्वे रुळावर पावसाळ्यात गस्त वाढविण्यात आली आहे. पहिल्यांदाच रेल्वे पुलांवर वॉचमनची ड्युटी लावण्यात आली आहे. रेल्वे येण्यापूर्वी पुलाकडील भागात पाऊस पडल्याची सूचना हे वॉचमन देणार आहेत. सूचना मिळताच रेल्वेगाड्यांना थांबविण्यात येईल किंवा कमी वेगाने गाड्या चालविण्यात येतील. अशा प्रकारची घटना सिंदी-तुळजापूर रेल्वे मार्गावर १९ जुलै २०१३ रोजी घडली होती. रुळाखालील माती वाहून गेल्यामुळे रेल्वे रुळ हवेत लोंबले होते. या घटनेत ४० मीटर रेल्वे रुळाखालील माती वाहून गेली होती. परंतु या घटनेची पूर्वसूचना मिळाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती. दरम्यान पावसामुळे रेल्वेगाड्या कमी वेगाने चालविण्यात येणार असून संवेदनशील भागात ९० ऐवजी ७५ किलोमीटर प्रतितास वेग ठरवून देण्यात आला आहे. तसेच रेल्वे रुळावर पाणी जमा झाल्यास ५० किलोमीटरच्या अधिक वेगाने गाड्या चालविण्यात येणार नसल्याची माहिती वरिष्ठ विभागीय अभियंता डी. आर. टेंभुर्णे यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)