शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन आरोपी बाल सुधार गृहात जुगार जिंकून केला होता खून

By admin | Updated: November 10, 2015 03:33 IST

केवळ ५०० रुपयांसाठी खून करणारा अल्पवयीन आरोपी नुकताच जुगार जिंकला होता. जुगारात जिंकल्याच्या उन्मादात त्याने मजूर तरुणाचा खून केला.

नागपूर : केवळ ५०० रुपयांसाठी खून करणारा अल्पवयीन आरोपी नुकताच जुगार जिंकला होता. जुगारात जिंकल्याच्या उन्मादात त्याने मजूर तरुणाचा खून केला. अल्पवयीन आरोपीच्या वयाबाबत वाद असल्यामुळे मृत दिलीप ऊर्फ गोलू अहीरवारचे कुटुंबीय सोमवारी सकाळी वस्तीतील नागरिकांसह पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. १७ वर्षीय विद्यार्थ्याने रविवारी दुपारी २० वर्षीय दिलीपचा खून केला होता. पूर्ण प्रकरण जुगाराशी संबंधित होते. सकाळी ११ वाजता आरोपी दिलीपचा चुलतभाऊ राकेश आणि इतर मुलांसोबत क्रिकेट खेळला. यानंतर जुगार खेळण्यात आला. यात राकेशकडून तो ५०० रुपयांचा डाव जिंकला. त्याने राकेशला पैसे मागितले, परंतु त्याने नकार दिला. त्याच्या काही वेळानंतर तो त्याच्याकडे वारंवार पैशासाठी तकादा लावू लागला. राकेश पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे आरोपीने वाद घातला. संपूर्ण प्रकरण माहीत असल्याने दिलीपने राकेशची बाजू घेत आरोपीला वाद न करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आरोपीने रागाच्या भरात त्याचा खून केला. मृत दिलीपच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात षड्यंत्र असल्याचा आरोप करीत प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी केली.अजनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी हा अल्पवयीन नसून वयस्क असल्याची तक्रार केली. खरा प्रकार लपविण्यासाठी आरोपीला अल्पवयीन असल्याचे सांगितले जात असल्याचाही त्यांचा आरोप आहे. कुटुंबीयांनी मृतदेह घेण्यासही नकार दिला. पोलिसांनी खूप समजावल्यानंतर मृताचे कुटुंबीय शांत झाले. दरम्यान आरोपीला न्यायालयाने बाल सुधार गृहात पाठविले. (प्रतिनिधी)