शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

मूल्यांकनानुसार मेडिकलला मिळणार ‘स्टार’

By admin | Updated: October 25, 2016 02:56 IST

आरोग्य सेवेसाठी असलेल्या राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये (मेडिकल) कौशल्यपूर्ण

राज्यभरातील रुग्णालयांसाठी ‘स्टार मार्किंग’ पद्धत सुमेध वाघमारे ल्ल नागपूर आरोग्य सेवेसाठी असलेल्या राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये (मेडिकल) कौशल्यपूर्ण डॉक्टर घडत आहेत का?, खरंच रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते काय? हा प्रश्न आज सर्वांपुढेच निर्माण झाला आहे. शासनालाही या प्रश्नाचे उत्तर हवे आहे. म्हणूनच राज्यभरातील १६ मेडिकलसाठी ‘स्टार मार्किंग’ पद्धती अमलात आणण्यात आली आहे. याला नुकतीच मंजुरी मिळाली असून या महिन्यापासून सुरुवातही झाली आहे. गेल्या वर्षीच्या कामगिरीवर ‘स्टार’ दिले जाणार आहे. यामुळे ‘फाईव्ह स्टार’ मिळविणारे मेडिकल कुठले राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही खासगी इस्पितळातील लूट आणि मनपा किंवा शासकीय रुग्णालयात नेल्यास रु ग्ण जीवानिशी जाण्याची भीती या कात्रीत आज गरीब व मध्यमवर्गीय सापडले आहेत. वैद्यकीय शिक्षणाबाबतही फारसे चांगले चित्र नाही. मेडिकलमध्ये गुणात्मक बदल होण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमईआर) सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांनी ‘स्टार मार्किंग’चा प्रस्ताव सादर केला. याला वरिष्ठांनी तत्काळ मंजुरी देत लागू करण्याचे निर्देशही दिले. या पद्धतीत रुग्णालयाच्या कामगिरीनुसार मूल्यांकन करून पाचपर्यंत चिन्हांकित स्टार दिले जाणार आहेत. यासंदर्भातील माहितीचे पत्र राज्याच्या सर्व मेडिकलमध्ये धडकले असून जास्तीत जास्त स्टार मिळविण्याच्या प्रयत्नांना सुरुवात झाली आहे.