शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल हाऊसफुल्ल

By admin | Updated: April 29, 2016 02:49 IST

वाढत्या तापमानाच्या आजारासोबतच इतरही आजारांच्या रुग्णांत वाढ झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व

एप्रिल हिटचा फटका : बालरोग, स्त्रीरोग व अस्थिरोग विभागात रुग्णांची गर्दीनागपूर : वाढत्या तापमानाच्या आजारासोबतच इतरही आजारांच्या रुग्णांत वाढ झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) अनेक विभागात रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाटाच शिल्लक नाहीत. एका खाटेवर दोन तर कुठे जमिनीवर गादी टाकून रुग्ण उपचार घेत आहे. सध्याच्या स्थितीत बालरोग, स्त्रीरोग व प्रसुती, अस्थिरोग व प्लास्टिक सर्जरी विभागात खाटांच्या संख्येत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. विशेष म्हणजे, स्त्रीरोग व प्रसुती विभागातील १९५ खाटांच्या दुप्पट ३९३ रुग्ण उपचार घेत आहेत. परिणामी, निवासी डॉक्टरांवर कामाचा ताण पडला आहे. शहराचे तापमान ४३-४५ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. प्रचंड उकाड्याचा आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. गॅस्ट्रो, कावीळच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. या शिवाय वाढत्या अपघातासोबतच डागा व मनपाच्या रुग्णालयात सोयींच्या अभावाने मेडिकलकडे रुग्णांचा ओघ वाढला आहे. इतर दिवसांमध्ये मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात साधारण १६०० वर रुग्ण येतात. परंतु मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या १९०० वर पोहचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बालरोग वॉर्डातील खाटांची संख्या १०० असताना उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या ११५ वर गेली आहे. गर्दीचा वॉर्ड म्हणून ओळख असलेल्या अस्थिरोग वॉर्डात ८० खाटा आहेत. याच्या तुलनेत रुग्णांची संख्या १२२ वर पोहचली आहे. स्त्रीरोग वॉर्डात खाटांची संख्या १९५ असताना रुग्णांची संख्या ३९३ वर गेली आहे. येथील अनेक गर्भवती प्रसुतीच्या वेदना सहन करीत जमिनीवर उपचार घेत आहेत. प्लास्टिक सर्जरीमध्ये खाटांची संख्या ४२ असताना उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ५० आहे.