शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

मेडिकलचा बिघडला 'रक्तदाब' : बहुसंख्य बीपी अ‍ॅपरेट्स नादुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 11:11 PM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एकीकडे कोट्यवधीची यंत्रसामुग्री खरेदी केली जात असताना दुसरीकडे आजाराच्या निदानासाठी वापरात असलेल्या सर्वसाधारण उपकरणांकडे दुर्लक्ष झाले आहे. रक्तदाब मोजणारे बहुसंख्य ‘बीपी अ‍ॅपरेट्स’ नादुरुस्त आहेत.

ठळक मुद्दे मेडिसीन विभागात ५०० रुग्णांकरिता एकच यंत्र

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एकीकडे कोट्यवधीची यंत्रसामुग्री खरेदी केली जात असताना दुसरीकडे आजाराच्या निदानासाठी वापरात असलेल्या सर्वसाधारण उपकरणांकडे दुर्लक्ष झाले आहे. सूत्रानुसार, रक्तदाब मोजणारे बहुसंख्य ‘बीपी अ‍ॅपरेट्स’ नादुरुस्त आहेत. विशेष म्हणजे, या यंत्राच्या दुरुस्तीला रोक लावण्यात आली आहे, तर नवे यंत्र कधी मिळणार याची कुणालाच शाश्वती नाही. परिणामी, सर्वाधिक रुग्ण असलेल्या ‘मेडिसीन’च्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) ५०० वर रुग्णांचे ‘बीपी’ एकाच यंत्रावर मोजले जात आहे.मेडिकलमध्ये केवळ विदर्भच नाहीतर आजूबाजूच्या राज्यातूनही रुग्ण येतात. सर्वाधिक रुग्ण औषधवैद्यकशास्त्र म्हणजे ‘मेडिसीन’ विभागात असतात. सूत्रानुसार, ओपीडी विभागात स्वत:चे रोज ५०० वर रुग्ण येतात तर इतर विभागातून तपासणीसाठी ३००वर रुग्णांना पाठविले जाते. साधारण ८००वर रुग्णांची तपासणी होते. सकाळी ८.३० वाजेपासून लागलेली रांग ९ वाजताच ओपीडी कक्षाबाहेर जाते. सर्वाधिक गर्दी याच विभागात राहत असतानाही येथील सोई व आवश्यक यंत्रसामुग्रीकडे मेडिकल प्रशासनाचे फारसे लक्ष नसल्याचे चित्र आहे.गुरुवारी मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या ‘फिटनेस’साठी एक रुग्ण मेडिसीनच्या ओपीडीत आला. त्याला केवळ रक्तदाब मोजण्यासाठी इतर रुग्णांच्या रांगेत लागावे लागले. एक तासानंतर त्याचा नंबर लागला. डॉक्टरांनी त्याच्याजवळचे कागदपत्र पाहत ‘बीपी’ तपासण्यासाठी पुन्हा बसण्यास सांगितले. ‘ओपीडी’त बीपी मोजण्याचे एकच यंत्र होते. एक कनिष्ठ डॉक्टर एक-एक रुग्णांचे ‘बीपी’घेत असल्याने पुन्हा अर्धा तास वाट पहाण्याची वेळ त्या रुग्णावर आली. यातही घाईघाईत चुकीचा रक्तदाब मोजला गेला. वरिष्ठ डॉक्टराला याचा संशय आल्याने त्यांनी पुन्हा रक्तदाब मोजला. असे प्रकार येथे रोज होत असल्याचे येथील एका कर्मचाऱ्याने सांगितले.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय