शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

मेयो, मेडिकलचा फायर ऑडिट रिपोर्ट सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

नागपूर : रुग्णालयांना आग लागण्याच्या घटना राज्यामध्ये लागोपाठ घडत आहेत. या घटनांमध्ये शेकडो रुग्णांना प्राण गमवावे लागले. असे असताना ...

नागपूर : रुग्णालयांना आग लागण्याच्या घटना राज्यामध्ये लागोपाठ घडत आहेत. या घटनांमध्ये शेकडो रुग्णांना प्राण गमवावे लागले. असे असताना नागपूरमधील मेयो व मेडिकल या दोन सरकारी रुग्णालयांमध्ये आवश्यक आग प्रतिबंधक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाब लक्षात घेता, राज्य सरकारला या दोन्ही रुग्णालयांचा फायर ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचा आदेश दिला. याकरिता सरकारला ३० जूनपर्यंत वेळ देण्यात आला.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. विदर्भातील सरकारी रुग्णालयांमधील समस्यांसंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. न्यायालय मित्र ॲड. अनुप गिल्डा यांनी या प्रकरणात नोट सादर करून सदर प्रश्नाकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. महानगरपालिकेने २०१३ व २०१६ मध्ये या दोन्ही रुग्णालयांचे फायर ऑडिट करून प्रशासनाला आवश्यक आग प्रतिबंधक उपाय करण्याच्या सूचना दिल्या. परंतु, प्रशासनाने त्या सूचनांचे पालन केले नाही. त्यामुळे दोन्ही रुग्णालये धोकादायक झाली आहेत. आग लागल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. परिणामी, न्यायालयाने सदर आदेश दिला. तसेच, आग प्रतिबंधक उपाययोजनांचे काम कधीपर्यंत पूर्ण केले जाईल, याची माहितीही मागितली.

-----------------

नवीन एमआरआय मशीन कधी मिळेल?

मेडिकलमधील एमआरआय मशीन १८ महिन्यापासून बंद पडली आहे. सध्या मेडिकल रुग्णालय याकरिता मेयो रुग्णालयावर अवलंबून आहे. मेडिकलमधील रुग्णांना एमआरआय करण्यासाठी मेयो रुग्णालयात पाठविले जात आहे. त्यामुळे रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, अशी माहितीदेखील ॲड. गिल्डा यांनी न्यायालयाला दिली. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता, नवीन एमआरआय मशीन खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया कोणत्या टप्प्यात आहे, ही प्रक्रिया केव्हापर्यंत पूर्ण होईल आणि मेडिकलला एमआयआर मशीन केव्हा मिळेल, यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश सरकारला दिले.

-------------

सी. एच. शर्मा यांना याचिकाकर्त्यांमधून वगळले

या प्रकरणाचे कामकाज पाहण्यासाठी ॲड. अनुप गिल्डा यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली असताना, याचिकाकर्ते सी. एच. शर्मा यांनी स्वत:करिता ॲड. प्रतीक शर्मा यांची स्वतंत्र नियुक्ती केली. ही बाब खटकल्यामुळे न्यायालयाने सी. एच. शर्मा यांचे नाव याचिकाकर्त्यांमधून वगळण्याचा आदेश दिला. हे जनहिताचे प्रकरण असून त्यात सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे. प्रकरणाचे कामकाज पाहण्यासाठी न्यायालय मित्राची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शर्मा यांना स्वतंत्र वकील नियुक्त करण्याची गरज नव्हती. त्यांनी आपली बाजू न्यायालय मित्राकडे मांडायला हवी होती, असे न्यायालयाने हा आदेश देण्यापूर्वी स्पष्ट केले.