शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
2
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
3
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
4
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
5
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
6
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
7
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
8
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
9
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
10
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
11
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
12
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
13
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
14
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
15
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
16
भोंदू खरातसोबत कथित व्यवहार प्रकरण; रुपाली चाकणकर यांची साडेआठ तास ईडी चौकशी
17
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
18
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
19
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
20
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
Daily Top 2Weekly Top 5

माया गँग अडकली

By admin | Updated: June 12, 2014 01:09 IST

गणेशपेठ येथील एसटी स्टॅण्ड चौकात दिवसाढवळ्या झालेल्या सूरज जयस्वाल याच्या खुनातील फरार माया गँगचे सहा सदस्य अजनी पोलिसांच्या हाती लागले आहेत. स्वत:ला वाचविण्यासाठी सूरजचा खून केल्याचे

अल्पवयीनसह सहा अटकेत : सूत्रधारास वाचविण्याचा प्रयत्न
नागपूर : गणेशपेठ येथील एसटी स्टॅण्ड चौकात दिवसाढवळ्या झालेल्या सूरज जयस्वाल याच्या खुनातील फरार माया गँगचे सहा सदस्य अजनी पोलिसांच्या हाती लागले आहेत. स्वत:ला वाचविण्यासाठी सूरजचा खून केल्याचे आरोपी सांगत असले तरी मुख्य सूत्रधाराला वाचविण्यासाठीच नवी कहाणी सांगितली जात असल्याची माहिती आहे.
अनुराग ऊर्फ अन्या वाघमारे (२३), स्वप्नील ऊर्फ बाबू भोयर (२२), आकाश ऊर्फ टिंग्या चव्हाण (२३), शुभम ऊर्फ पेट्या गजघाटे (२२), आणि त्याचे दोन अल्पवयीन साथीदार, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. सर्व आरोपी अजनी पोलीस ठाणे हद्दीतील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीत राहतात.
९ जून रोजी दुपारी एसटी स्टॅण्ड चौकात सूरजचा खून करण्यात आला. पोलीस चौकीजवळच झालेल्या या खुनामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली.
एसटी स्टॅण्ड चौकातील पोलीस चौकीत तैनात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले. प्राथमिक तपासात ही हत्या माया गँगद्वारा करण्यात आल्याची माहिती पुढे आली. यानंतर गणेशपेठ आणि अजनी पोलीस संयुक्तपणे आरोपीच्या शोध घेत होते. अजनी पोलिसांना बुधवारी दुपारी आरोपी बेसा येथे लपून असल्याची माहिती मिळाली. या आधारावर उपायुक्त चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार एल.जी. डुंबरे आणि उपनिरीक्षक रवी राजुलवार यांनी कारवाई करून आरोपीला अटक केली.
सूत्रानुसार सूरज हा ठाकूर गँगशी जुळलेला होता. आरोपी माया गँगचे सदस्य आहेत. माया गँगला चिंतलवार समूह आणि तुरुंगात बंदिस्त असलेला अमर लोहकरे चालवितात. ठाकूर गँग आणि चिंतलवार-लोहकरे या दोन्ही गँगमध्ये अनेक दिवसांपासून वैर सुरू आहे. काही दिवसांपूर्वी लोहकरे विरुद्ध तुरुंगातून हप्ता वसुली केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून दोन्ही गँग एकमेकांच्या विरोधात उभी ठाकल्या आहेत.
मृत सूरजने अनुराग ऊर्फ अन्यावर गेल्या आठवड्यात हल्ला केला होता. एका वर्षापूर्वी शुभम ऊर्फ पेट्यालाही जखमी केले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपीनुसार सूरज हा त्यांची हत्या करणार होता. त्यामुळे स्वत:चा जीव वाचविण्यासाठीच त्याचा खून करण्यात आला. या खुनातील आरोपी मिहीर, सलमानसह आणखी पाच ते सहा आरोपीचा शोध घेतला जात आहे. आरोपी गणेशपेठ पोलिसांना सोपविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)