Nagpur Crime: 'माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला जिवंत मारीन' ; एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 19:44 IST2025-10-10T19:42:20+5:302025-10-10T19:44:31+5:30
Nagpur Crime: हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर, तर तिला वाचविण्यासाठी सरसावलेला विद्यार्थी किरकोळ जखमी झाला असून, आरोपी सावनेरच्या दिशेने पळून गेला.

'Marry me, or I'll kill you alive'; Student attacked with knife out of one-sided love
सावरगाव : कॉलेजमध्ये जात असलेल्या विद्यार्थिनीवर धावत्या बसमध्ये प्राणघातक हल्ला चढवीत चाकूने वार केल्याची घटना नरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावरगाव येथे गुरुवारी (दि. ९) सकाळी नऊच्या सुमारास घडली. या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर, तर तिला वाचविण्यासाठी सरसावलेला विद्यार्थी किरकोळ जखमी झाला असून, आरोपी सावनेरच्या दिशेने पळून गेला. हा हल्ला एकतर्फी प्रेमातून करण्यात आल्याची माहिती काही जाणकार व्यक्तींनी दिली.
नितीन सोपीनाथ तागडे (रा. जुनोना (फुके), ता. नरखेड) असे फरार आरोपीचे नाव आहे. जखमी विद्यार्थिनी सिंदी (उमरी, ता. नरखेड) येथील रहिवासी असून, ती काटोल शहरातील नबिरा महाविद्यालयात बी.एस्सी.च्या पहिल्या वर्षाला शिकते. ती रोज मध्य प्रवेश परिवहनच्या बसने कॉलेजमध्ये जाते. तिच्या कॉलेजमध्ये जाण्याची वेळ आरोपी नितीनला माहिती आहे. ती गुरुवारी सकाळी एमपी-२८/पी-१०९९ क्रमांकाच्या बसने कॉलेजमध्ये जायला निघाली. बसमध्ये प्रवाशांसोबत इतर विद्यार्थीदेखील होते. नितीन मध्येच बसमध्ये चढला.
त्याने बसमध्ये 'माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी तुला जिवंत मारीन' अशी धमकी देत तिच्याशी वाद घालायला सुरुवात केली. काही
एकतर्फी प्रेम व लग्नासाठी दबाव नितीन त्या विद्यार्थिनीवर एकतफीं प्रेम करतो. तो मागील तीन वर्षांपासून तिचा सतत पाठलाग करायचा व लग्न करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकायचा. तो बुधवारी (दि. ८) रात्री सिंदी (उमरी) येथे तिच्या घरी गेला होता. 'तुम्ही माझे तिच्याशी लग्न लावून दिले नाही तर तुमच्या मुलीला जिवंत मारीन' अशी धमकीही त्याने तिच्या आईवडिलांना दिली होती. आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह पालक व नागरिकांनी केली आहे.
कळायच्या आत त्याने चाकूने तिच्या छातीवर एक वार केला. ती ओरडताच बसमध्ये असलेला यश काळबांडे (१९, रा. सावरगाव, ता. नरखेड) हा विद्यार्थी तिच्या मदतीला धावला. त्याने नितीनच्या हाती असलेला चाकू पकडून दुसरा वार वाचविला. या धावपळीत त्याच्या हातालाही दुखापत झाली. ती जखमी होताच बस थांबविण्यात आली. सावरगाव येथील नागरिक गोळा होण्यापूर्वीच नितीनचे बसमधून उडी मारून पळ काढला. तिच्यासह यशवर सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. याप्रकरणी नरखेड पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध घेणे सुरू केले आहे. वृत्त लिहिस्तो त्याला अटक करण्यात आली नव्हती.