शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मार्डचा आता एचआयव्हीविरुद्ध लढा

By admin | Updated: November 30, 2015 02:38 IST

देशात एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण ५७ टक्क्यांनी कमी झाले आहे. तसेच गेल्या दशकात या आजारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी घटले आहे.

मंगळवारपासून लावणार रेड रिबीन : १५ ते २५ वयोगटातील युवकांचे करणार प्रबोधननागपूर : देशात एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण ५७ टक्क्यांनी कमी झाले आहे. तसेच गेल्या दशकात या आजारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी घटले आहे. हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आता निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ही पुढाकार घेणार आहे. १ डिसेंबर या जागतिक एड्स दिनापासून ते आठवडाभर या रोगाची जनजागृतीची मोहीम चालवणार आहे. विशेष म्हणजे, सात दिवस रेड रिबीन लावून सर्व निवासी डॉक्टर आपली सेवा देतील. या शिवाय उपचारासाठी येणाऱ्या १५ ते २५ वर्षांच्या युवकांना एड्स विषयी माहिती देतील. आजारांवर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे जास्त गरजेचे आहे. याच आधारावर सेंट्रल मार्डने जागतिक एड्स दिनापासून विविध उपक्रम हाती घेतले आहे. सेंट्रल मार्डचे अध्यक्ष सागर मुंधडा यांनी ‘लोकमत’ला सागितले, सात दिवस चालणाऱ्या या उपक्रमात राज्यातील सर्व निवासी डॉक्टर रेड रिबीन लावून आपली सेवा देणार आहेत. ‘प्रथम एचआयव्ही चाचणी नंतर कुंडली’ या घोषवाक्याचा प्रचारच नाहीतर स्वत: अमलातही आणतील. ज्या डॉक्टरांचे लग्न होणार आहे ते डॉक्टर कुंडलीची जुळवाजुळव करण्यापूर्वी स्वत:ची आणि होणाऱ्या पत्नीची एचआयव्ही चाचणी करतील. त्यानंतर लग्नाच्या बोहल्यावर उभे राहतील. ‘एड्स पासून मुक्ती’ सारख्या अनेक फसव्या जाहिरातींना उत आला आहे. विशेषत: ग्रामीण लोक याला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे. त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी या संदर्भातील जाहिराती डॉक्टरांच्या मोबाईलमध्ये असणार आहे. गावखेड्यातून आलेल्या रुग्णांना ही जाहिरात दाखवून जनजागृती केली जाणार आहे. एचआयव्हीला १५ ते २५ वयोगटातील सर्वाधिक युवक बळी पडतात. यासाठी प्रत्येक निवासी डॉक्टराकडे या वयोगटातील युवक आले तर त्यांच्या आजारावर उपचार करीत त्यांना एड्सबाबतची माहिती देतील. हा रोग कसा पसरतो, त्यावरील उपचार आणि उपाययोजनांवर मार्गदर्शन करतील, असेही डॉ. मुंधडा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)