शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
3
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
4
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
5
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
6
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
7
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
8
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
9
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
10
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
11
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
12
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
13
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
14
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
16
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
17
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
18
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
19
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
20
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

मराठेकडे कोट्यवधीची मालमत्ता

By admin | Updated: June 15, 2015 02:57 IST

माजी मंत्री छगन भूजबळ आणि त्यांच्याशी संबंधित कंपनीच्या गैरव्यवहारात सहभागी असल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक ....

एसीबीने घेतली सदनिकेची झडती : रोख, दागिने आढळले नागपूर : माजी मंत्री छगन भूजबळ आणि त्यांच्याशी संबंधित कंपनीच्या गैरव्यवहारात सहभागी असल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हे दाखल केलेले बांधकाम विभागाचे तत्कालीन सचिव देवदत्त गंगाधर मराठे यांच्या स्थानिक सदनिकेत एसीबीच्या पथकाने झडती घेतली. या झडतीत रोख, दागिने आणि कागदपत्रांसह १ कोटींची मालमत्ता एसीबीच्या पथकाला गवसली.११ जूनला एसीबीने छगन भुजबळ, पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांच्यासह एकूण १७ जणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. त्यात तत्कालीन बांधकाम मंत्रालयातील सचिव देवदत्त मराठे यांचाही समावेश आहे. मराठे नागपूरशी संबंधित असून, त्यांची येथील शिवाजीनगरातील सिमेंट रोडवर सदनिका आहे. या सदनिकेत शुक्रवारी सायंकाळी एसीबीच्या पथकाने झाडाझडती घेतली. एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांच्या माहितीनुसार, या झडतीत मराठे यांच्या नागपूरसह तीन ठिकाणी सदनिका, अंदाजे ३५ लाखांचे सोन्याचे दागिने, ७० हजार रोख तसेच ठिकठिकाणच्या मालमत्तेची कागदपत्रे आढळली. त्यावरून मराठे यांची मालमत्ता सुमारे १ कोटींच्या घरात असल्याचा अंदाज जैन यांनी व्यक्त केला. या झडती कारवाईचा अहवाल एसीबीच्या मुंबई मुख्यालयात पाठविण्यात आला असून, वरिष्ठांच्या आदेशानुसार चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)