आधी पत्नी व मुलीची गळा चिरून हत्या.. मग स्वत: घेतला गळफास; नागपुरातील धक्कादायक घटना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2022 12:10 IST2022-03-12T10:33:36+5:302022-03-12T12:10:26+5:30
हिंगणा एमआयडीसीतील राजीव नगर येथे एका व्यक्तीने पत्नीसह मुलीची गळा चिरून हत्या केली व नंतर गळफास घेत स्वत:च्या जीवनाचा अंत केला.

आधी पत्नी व मुलीची गळा चिरून हत्या.. मग स्वत: घेतला गळफास; नागपुरातील धक्कादायक घटना!
नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत राजीव नगर तरोडा मोहल्ल्यात एकाने पत्नी व मुलीची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मृत व्यक्तीचे नाव विलास चंपतराव गवते असून त्याने रात्रीच्या सुमारास पत्नी रंजना (४५) व मुलगी अमृता (१३) यांचा गळा चिरून हत्या केली व नंतर स्वतः फाशी घेतली. त्याने अस टोकाचं पाऊल का उचललं या संदर्भात अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. मात्र, कौटुंबिक वादातून त्याने हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पुढील तपास सुरू आहे. या घटनेने नागपुरात एकच खळबळ उडाली आहे.