शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

काटोलमध्ये महिंद्राचा व्हेंडर डेव्हलपमेंट पार्क

By admin | Updated: November 28, 2015 03:29 IST

काटोल एमआयडीसीचा २१२.१० हेक्टरने विस्तार होणार आहे. या संबंधीची अधिसूचना राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने जारी केली आहे.

एमआयडीसीचा २१२ हेक्टरने विस्तार : उद्योग विभागातर्फे अधिसूचना जारीनागपूर : काटोल एमआयडीसीचा २१२.१० हेक्टरने विस्तार होणार आहे. या संबंधीची अधिसूचना राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने जारी केली आहे. विस्तारित एमआयडीसीचा ‘आॅटो कंपोनंट हब’ म्हणून विकसित करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. प्राप्त माहितीनुसार महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राने येथे ‘व्हेंडर डेव्हलपमेंट पार्क’ उभारण्याची तयारी चालविली आहे. काटोल एमआयडीसीचा विस्तार करून तिचा ‘आॅटो कंपोनंट हब’ करण्याची मागणी आ. आशिष देशमुख यांनी राज्य सरकारकडे केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यासाठी पुढाकार घेतला व राज्य सरकारने काटोल एमआयडीच्या विस्ताराची अधीसूचना जारी केली. काटोल तालुक्यातील मौजा गोन्ही येथील ११.६२ हेक्टर, मौजा येनवा येथील ९२.२७ हेक्टर, मौजा सालई येथील ४८.९५ हेक्टर, मौजा कारला येथील ५९.२६ हेक्टर अशा एकूण २१२.१० हेक्टर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. आता जिल्हाधिकारी अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू करतील. राज्य सरकारच्या नव्या अधिग्रहण परिपत्रकानुसार थेट शेतकऱ्यांशी वाटाघाटी होऊन मोबदला दिला जाईल.महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्राचा हिंगणा येथे ट्रॅक्टर निर्मिती कारखाना आहे. या प्लांटसाठी महिंद्रला दरवर्षी २८०० कोटी रुपयांचे स्पेअर पार्ट व कम्पोनंट परराज्यातून आणावे लागतात. त्यामुळे हे सर्व पार्ट नागपूर जिल्ह्यातच बनविण्याचा महिंद्राचा विचार आहे. काटोल एमआयडीसीच्या विस्तारीत जागेत हा प्रकल्प उभारण्याचा महिंद्राचा विचार आहे. त्यासाठी सरकारशी चर्चा सुरू असून चर्चा अंतिम टप्प्यात आहे. सरकारकडूनही जागा देण्याबाबत सकारात्मक संकेत आहेत. महिंद्राच्या सर्वेक्षण चमूने जागेची पाहणीही केली आहे. याशिवाय या विस्तारित एमआयडीची ‘आॅटो कम्पोनंट हब’ म्हणून विकास केल्यास भोपाळ येथील आयशर ट्रॅक्टर, इंदूर येथील जॉन डियर व जहिराबाद येथे महिंद्राच्या ट्रॅक्टर निर्मिती कारखान्यांना लागणारे पार्ट येथे तयार होतील.