शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भिवापूर पोलीस स्टेशन मध्ये ‘महिलाराज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:10 IST

भिवापूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भिवापूर पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी ‘महिलाराज’ पाहायला मिळाले. एकदिवसीय ठाणेदार म्हणून पोलीस कर्मचारी ...

भिवापूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भिवापूर पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी ‘महिलाराज’ पाहायला मिळाले. एकदिवसीय ठाणेदार म्हणून पोलीस कर्मचारी दुर्गा शंभरकर यांनी यशस्वीरीत्या सूत्रे सांभाळली. वाहतूक पोलीस ते स्टेशन डायरी पोलीस स्टेशनचा असा अख्खा कारभारच महिलांनी सांभाळला. एवढेच नव्हे तर अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींच्या मुसक्याही त्यांनी आवळल्या.

उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर यांनी महिला दिनानिमित्त सोमवारी पोलीस स्टेशनमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ठाणेदार भोरटेकर यांनी पोलीस हवालदार दुर्गा शंभरकर यांना एकदिवसीय ठाणेदार म्हणून पोलीस स्टेशनची सूत्रे सोपविली. शिवाय तालुक्यातील सर्व महिला पोलीस पाटील यांना पोलीस स्टेशनमध्ये निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त गृहमंत्री अनिल देशमुख यांचे शुभेच्छा पत्र महिला पोलीस पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आले.

एकदिवसीय ठाणेदार दुर्गा शंभरकर यांच्या नेतृत्वात महिला पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास राष्ट्रीय मार्गावरील सिनेमा टॉकीज परिसरात दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. यात २,८०० रुपयाच्या दारूसह आरोपी अजय गणपत पराते (३५) यास अटक करण्यात आली. कारवाई करणाऱ्या पथकात ठाणेदार दुर्गा शंभरकर, ज्योत्स्ना कारेमोरे, मीरा केंद्रे, मंगला जाधव, पूजा इंगळे, मृणाल चाके, कविता समर्थ, दीपमाला जाधव, नगमा शेख, अर्चना मुट्टलवार, निलक्षा नेवारे आदीचा सहभाग होता

-

शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस स्टेशनचा प्रत्येक कर्मचारी कटिबद्ध आहे. जागतिक महिला दिनी महिलांच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने पोलीस अधीक्षक राकेश ओला व उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशनमध्ये विविध उपक्रम राबविल्या गेले. प्रत्येक क्षेत्रात महिला मातृशक्तीचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे केवळ महिला दिनी महिलांचा सन्मान मर्यादित न राहता, प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी महिलांचा सन्मान व्हायलाच पाहिजे, हाच उद्देश पोलीस विभागाचा आहे.

- महेश भोरटेकर, पोलीस निरीक्षक, भिवापूर