शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
2
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
3
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
4
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
6
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
7
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
8
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
9
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
10
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
11
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
12
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
13
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
14
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
15
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
16
Bhuban Badyakar : 'कच्चा बादाम' फेम भुबन बड्याकरची मोठी फसवणूक; मनोरंजन सृष्टीतील लोकांनी स्वप्नं दाखवली अन्...
17
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
18
महामार्गांवर नो पार्किंग; ढाबे आणि हॉटेल्सवरही बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!
19
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
20
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात टक्केवारी घटली, धाकधूक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 21:00 IST

२०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी काहीशी घटल्याचे दिसून आले. २०१४ मध्ये जिल्ह्यात सरासरी ६१.६५ टक्के मतदान झाले होते. यंदा निवडणूक आयोगाच्या प्राथमिक अंदाजानुसार ५८ ते ५९ टक्के मतदान झाले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांसह नेत्यांचे मतदान : किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पावसाच्या सावटाखाली सोमवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला संपूर्ण जिल्ह्यात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. २०१४ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी व काही किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. २०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी काहीशी घटल्याचे दिसून आले. २०१४ मध्ये जिल्ह्यात सरासरी ६१.६५ टक्के मतदान झाले होते. यंदा निवडणूक आयोगाच्या प्राथमिक अंदाजानुसार ५८ ते ५९ टक्के मतदान झाले. सर्वच पक्षांतील दिग्गज नेत्यांसह जिल्ह्यात एकूण १४६ उमेदवारांचे भाग्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद झाले व गुरुवारी निकाल समोर येणार आहे. नागपूर शहराच्या तुलनेत नागपूर ग्रामीणमधील सहा जागांवर मतदानाचा जास्त उत्साह पहायला मिळाला.जिल्ह्यातील सर्वच मतदानकेंद्रांवर सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. ढगाळलेले वातावरण असल्याने थंडावा होता व अनेकांनी ‘मॉर्निंग वॉक’नंतर लगेच मतदान केले. दुपारच्या सुमारास मतदानाचा उत्साह नक्कीच थोडा कमी झाला. मात्र दुपारनंतर मतदारांची पावले मतदान केंद्रांकडे वळली. विद्यार्थ्यांपासून ते नामवंत व्यक्तीपर्यंत अनेकांनी सकाळीच मतदानासाठी हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडक री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी, खा.विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण जिल्ह्यात ‘ईव्हीएम’ खराब झाल्यासंदर्भातील काही तक्रारी प्राप्त झाल्या. किरकोळ अपवाद वगळता जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडले.सर्वाधिक उत्साह उमरेडमध्ये 

नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी जिल्ह्यात सरासरी सुमारे ५८ ते ५९ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान उमरेडमध्ये (६८.०३ %) तर सर्वात क मी पश्चिम नागपूर मतदारसंघात (४८.४५ % ) मतदान झाले. याशिवाय जिल्ह्यात काटोल (६४.५५ %), हिंगणा (५७.१५ %), रामटेक (६२.६९ %), कामठी (५७.२० %), सावनेर (६६.२५ %) येथे इतके मतदान झाले. तर नागपूर शहरात नागपूर दक्षिण-पश्चिम (४९.५१ %), नागपूर दक्षिण (४८.९४ %), नागपूर पूर्व (५३.१८ %), नागपूर मध्य (५०.१३ %), नागपूर उत्तर (५०.७१ %) इतके मतदान झाले. मतदानाची टक्केवारी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अंतिम झाल्यानंतर मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदानnagpurनागपूर