शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
2
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
3
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
4
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
5
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
6
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
7
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
8
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
9
महिला आरक्षण: सुप्रिया सुळेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले; म्हणाल्या, “वेळ-जागा सांगा”
10
गुरुपुष्यामृत योग २०२६: केवळ सोने खरेदीच नाही, तर आयुष्याला सोन्याची झळाळी देणारा 'गुरुपुष्य' योग!
11
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
12
गाडी खरेदी करताना शोरूममधूनच इन्शुरन्स घेणे बंधनकारक आहे का? काय आहे नियम?
13
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
14
जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
15
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
16
एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे
17
Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!
18
Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?
19
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
20
शेवटची इच्छा पूर्ण! 'स्वरस्वामिनी' आशा भोसले यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात ५८.३ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 23:10 IST

संपूर्ण नागपूर जिल्ह्यात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. २०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी काहीशी घटल्याचे दिसून आले. २०१४ मध्ये जिल्ह्यात सरासरी ६०.७१ टक्के मतदान झाले होते. यंदा निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार मतदानाची सरासरी टक्केवारी ५८.३० टक्के इतकी आहे.

ठळक मुद्देकिरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत : पावसाची मेहरबानीनवमतदारांमध्ये उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाच्या सावटाखाली सोमवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला संपूर्ण जिल्ह्यात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. २०१४ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी व काही किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. २०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी काहीशी घटल्याचे दिसून आले. २०१४ मध्ये जिल्ह्यात सरासरी ६०.७१ टक्के मतदान झाले होते. यंदा निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार मतदानाची सरासरी टक्केवारी ५८.३० टक्के इतकी आहे. सर्वच पक्षांतील दिग्गज नेत्यांसह जिल्ह्यात एकूण १४६ उमेदवारांचे भाग्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद झाले व गुरुवारी निकाल समोर येणार आहे. नागपूर शहराच्या तुलनेत नागपूर ग्रामीणमधील सहा जागांवर मतदानाचा जास्त उत्साह पहायला मिळाला.

जिल्ह्यातील सर्वच मतदानकेंद्रांवर सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. ढगाळलेले वातावरण असल्याने थंडावा होता व अनेकांनी ‘मॉर्निंग वॉक’नंतर लगेच मतदान केले.

दुपारच्या सुमारास मतदानाचा उत्साह नक्कीच थोडा कमी झाला. मात्र दुपारनंतर मतदारांची पावले मतदान केंद्रांकडे वळली. विद्यार्थ्यांपासून ते नामवंत व्यक्तीपर्यंत अनेकांनी सकाळीच मतदानासाठी हजेरी लावली.‘व्हीआयपी’ मतदारांचे मतदानमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडक री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी, राज्याचे ऊर्जामंत्री व भाजपचे पूर्व विदर्भ प्रचार प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, खा.विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण जिल्ह्यात ‘ईव्हीएम’ खराब झाल्यासंदर्भातील काही तक्रारी प्राप्त झाल्या. किरकोळ अपवाद वगळता जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडले.सर्वाधिक उत्साह काटोलमध्येनागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी जिल्ह्यात ५८.३० टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान काटोलमध्ये (७०.५५ %) तर सर्वात क मी पश्चिम नागपूर मतदारसंघात (४९.६० % ) मतदान झाले. याशिवाय जिल्ह्यात उमरेड (६८.२३ %), हिंगणा (५७.३५ %), रामटेक (७०.०९ %), कामठी (५८.९५ %), सावनेर (६८.१४ %) येथे इतके मतदान झाले. तर नागपूर शहरात नागपूर दक्षिण-पश्चिम (५०.३७ %), नागपूर दक्षिण (५०.८० %), नागपूर पूर्व (५३.५३ %), नागपूर मध्य (५०.८८ %), नागपूर उत्तर (५१.११ %) इतके मतदान झाले. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार नागपूर शहरात सरासरी ५१.०४ टक्के तर नागपूर ग्रामीणमधील सहा जागांवर ६५.५४ टक्के मतदान झाले.सावनेरमध्ये तणावसावनेर मतदार संघातील सिल्लेवाडा येथे भाजपचे उमेदवार डॉ.राजीव पोतदार त्यांच्या समर्थकासह मतदान केंद्रात शिरल्याने माजी ग्रामपंचायत सदस्या वसुंधरा शहाणे यांनी त्यांना हटकले. यावरून येथे काही काळ तणाव निर्माण झाला.सोशल मीडियावर सबकुछ ‘व्होटिंग’प्रत्यक्ष मतदानकेंद्रांवर मतदान केल्यानंतरदेखील अनेक नवमतदारांचा अन् तरुणांचा उत्साह कमी झाला नव्हता. मतदान केल्याची बोटावरील शाईची खूण गर्वाने दाखवत ‘फोटोसेशन’लादेखील ऊत आला होता अन् लगेच ‘सोशल मीडिया’वर ‘शेअर’ करणेदेखील सुरू होते. ‘मी मतदान केले’, ‘प्लीज, डू व्होट’ अशा पद्धतीच्या ‘मॅसेज’ची देवाणघेवाण सुरू होती.मतदानाच्या टक्केवारीचा पल्लावेळ                          टक्केवारीसकाळी ९ वाजता      ७.२६ %सकाळी ११ वाजता    १९.७४ %दुपारी १ वाजता        २९.७८ %दुपारी ३ वाजता        ४३.३१ %सायंकाळी ६ वाजता ५८.३० %मतदारसंघनिहाय आकडेवारीमतदारसंघ                 २०१९                 २०१४नागपूर दक्षिण पश्चिम ५०.३७ %            ५६.२३ %नागपूर दक्षिण           ५०.८० %            ५३.२७ %नागपूर पूर्व                ५३.५३ %           ५६.२८ %नागपूर मध्य              ५०.८८ %           ५५.१२ %नागपूर पश्चिम            ४९.६० %           ५२.१४ %नागपूर उत्तर             ५१.११ %            ५३.५५ %काटोल                     ७०.५५ %           ७०.३८ %सावनेर                     ६८.१४ %           ६८.९१ %हिंगणा                      ५७.३५ %          ६५.९९ %उमरेड                      ६८.२३ %          ६५.८१ %कामठी                     ५८.९५ %          ६२.२४ %रामटेक                   ७०.०७ %           ६८.५७ %सरासरी                 ५८.३० %         ६०.७१ %

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpurनागपूर