शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

महानुभाव धर्मसूत्र महिलांच्या वस्त्रावर

By admin | Updated: July 17, 2016 01:46 IST

महानुभाव पंथीयांसाठी परमपवित्र असलेले धर्मसूत्र महिलांच्या वस्त्रावर डिझाईन म्हणून वापरल्याने समाजामध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.

समाजामध्ये रोष : आंदोलनाचा इशारा नागपूर : महानुभाव पंथीयांसाठी परमपवित्र असलेले धर्मसूत्र महिलांच्या वस्त्रावर डिझाईन म्हणून वापरल्याने समाजामध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. शहरातील एका मॉलमध्ये धर्मसूत्र डिझाईन केलेले कपडे विक्रीस ठेवल्याने पंथीयांच्या भावना दुखावल्या गेल्या असून याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा महंत धुळधर बाबा यांनी केला. महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधरस्वामी यांनी ८५० वर्षापूर्वी ही धर्मसूत्रे सांगितली होती. ही धर्मसूत्रे महानुभाव पंथीयांसाठी परमपवित्र मानली जातात. भाजयुमोचे पदाधिकारी अजय बोढारे यांनी सांगितले की, एक ा मॉल्समध्ये धर्मसूत्र लिहिलेले महिलांचे कपडे विक्रीसाठी ठेवले होते. समाजबांधव पायात चप्पल असताना ही धर्मसूत्रे उच्चारत सुध्दा नाही. मात्र शोरूममध्ये असलेल्या कपड्यांच्या पायावर येणाऱ्या भागावर ही सूत्रे लिहिल्या गेली आहेत. बोढारे यांनी सांगितले की, याबाबत माहिती मिळताच आम्ही संबंधित मॉलच्या व्यवस्थापकाला जाऊन भेटलो व त्यांना हे कपडे मॉलमधून हटवावे आणि डिझाईन करणाऱ्याचे नाव जाहीर करावे, अशी मागणी केली. त्यांनी हे कपडे हटविण्यात आल्याचे सांगितले. मात्र काही दिवसात हेच कपडे दुसऱ्या शहरातील मॉलमध्ये आढळून आले. त्यामुळे एका ठिकाणी विरोध झाल्यास दुसऱ्या शहरात विक्रीला पाठविणे ही गंभीर बाब असल्याचे बोढारे यांनी सांगितले. कपड्यांवर धर्मसूत्रे छापणे ही विकृत मानसिकता असून मॉल संचालकाने संबंधित डिझायनरचे नाव जाहीर करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. महानुभाव पंथाचे तत्त्वज्ञान अहिंसेचा पुरस्कार करणारे आहे व समाज त्यानुसार मार्गक्रमण करतो आहे. मात्र त्यामुळे आम्हाला भ्याड समजू नये, असा इशारा बोढारे यांनी यावेळी दिला. त्यामुळे मॉल चालकाने देशातील सर्व मॉलमधून हे कपडे हद्दपार करावे आणि हे कपडे निर्माण करणाऱ्याचे नाव जाहीर करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. याबाबत पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)