प्रेमविवाह, इंस्टाग्रामवरील मित्र आणि संशयाचा किडा ! पतीने पत्नीवर फावड्याने वार करत केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 18:39 IST2025-10-28T18:38:23+5:302025-10-28T18:39:36+5:30
Nagpur : आरोपी किशोर हा गॅरेजमध्ये काम करत होता. एक महिन्यापूर्वी पत्नी रिंकी इंस्टाग्रामवरील मित्रासोबत बाहेर गेली होती आणि त्यावरून किशोरने तिच्याशी मोठा वाद घातला होता.

Love marriage, friends on Instagram and a worm of suspicion! Husband kills wife by stabbing her with a shovel
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर/हिंगणा : अनैतिक संबंधांच्या संशयाच्या किड्यामुळे पत्नीचा जीव गेला. संशयाने ग्रस्त असलेल्या पतीने पत्नीवर फावड्याने वार करत तिची हत्या केली. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
रिंकी किशोर प्रधान (२३, पंचशीलनगर, एमआयडीसी) असे मृत महिलेचे नाव आहे, तर तिचा पती किशोर शंकर प्रधान (३१) असे आरोपीचे नाव आहे. मागील अनेक दिवसांपासून किशोर तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता आणि त्यावरून त्यांच्यात वाद व्हायचे. अनेकदा वाद विकोपालाही गेले होते. २६ ऑक्टोबर रोजी दुपारी रिंकी फोनवर बोलत होती. त्यावरून किशोरला संताप आला. त्याने टोकल्यावर रिंकीही संतापली आणि त्यांच्यात मोठा वाद झाला. किशोरने घरातील फावड्याने रिंकीच्या डोक्यावर वार केले व त्यात ती जखमी झाली. रक्तबंबाळ अवस्थेतील रिंकीला किशोरनेच लता मंगेशकर इस्पितळात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल करत त्याला अटक केली आहे.
प्रधान कुटुंब मूळचे ओरीसा राज्यातील आहे. कामाच्या शोधात हिंगणा एमआयडीसी परिसरातील ईसासनी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भीमनगर परिसरात भाड्याच्या खोलीत वास्तव्याला होते. पाच वर्षापूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. आरोपी किशोर हा गॅरेजमध्ये काम करत होता. एक महिन्यापूर्वी पत्नी रिंकी इंस्टाग्रामवरील मित्रासोबत बाहेर गेली होती आणि त्यावरून किशोरने तिच्याशी मोठा वाद घातला होता.