शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

मनसर-तुमसर रस्त्याचे सौंदर्य हरविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:10 IST

रामटेक : रामटेक हे जागतिक कीर्तीचे ठिकाण आहे. हिरवीगार वनराई व उंचच उंच सातपुडा पर्वतरांगा. ठिकठिकाणी साैंदर्यात भर टाकणारे ...

रामटेक : रामटेक हे जागतिक कीर्तीचे ठिकाण आहे. हिरवीगार वनराई व उंचच उंच सातपुडा पर्वतरांगा. ठिकठिकाणी साैंदर्यात भर टाकणारे तलाव, कालिदासाचे वास्तव्य, प्रभू रामचंद्रांचा पदस्पर्श, नागार्जुन मुनीचे कर्मस्थान, जैन मंदिर अशा कितीतरी गोष्टींचा प्राचीन वारसा या तालुक्याला लाभला आहे. या ठिकाणचे साैंदर्य अधिक फुलावे म्हणून मनसर ते तुमसर हा रस्ता बनविण्यात येत आहे. मात्र हा मार्ग राजकीय हस्तक्षेपामुळे साैंदर्यात भर घालण्यापेक्षा अश्रू ढाळत आहे! या रस्त्याचे काम ९५ टक्के संपले आहे. काही काम शिल्लक आहे. या रस्त्याचे चौपदरीकरण शक्य होते. रस्त्याच्या मधोमध फुलझाडे लावता आली असती. दाेन्ही बाजूने लाईटची व्यवस्था, एका बाजूने दाेन गाड्या एकाच वेळी जाऊ शकल्या असत्या. वळण सरळ करता आले असते. दाेन्ही बाजूने जाळ्या लावता आल्या असत्या. या सर्वामुळे रस्त्याचे सौंदर्य फुलले असते. पण सध्या यापैकी काहीही हाेणार नाही.

राजकीय पुढाऱ्यांनी कुणी बॅरिकेड्‌स लावू नका, कुणी मधात येणारे झाडे ताेडू नका, रस्ता उंच करू नका, दाेन्ही बाजूने सर्व्हिस राेड बनवा, असा दबाव आणला. त्यामुळे काम थांबले. सर्व्हिस राेड तयार झाल पण रस्त्याचे काम हाेण्याअगाेदरच येथे अतिक्रमण झाले. सर्व्हिस राेड दुकानदाराच्या ताब्यात गेला. त्यामुळे सर्व्हिस राेड कुणासाठी बनविला, हे कळायला मार्ग नाही.

या रस्त्यावर बॅरिकेड्‌स अर्धे लागले. अर्धे तसेच राहणार आहे. काही ठिकाणी पाेलवर लाईट लावले, पण कुठे सुटले आहेत. मनसरजवळही वळण सरळ हाेऊ दिले नाही. कंपनीला त्यांच्या प्लॅननुसार काम करता आले नाही. रामटेकच्या बसस्थानक चाैकात साैंदर्यीकरण करण्यात येणार आहे. तिथे फुलझाडे व हायमास्ट लावले जाणार आहे. पण यात बाजूच्या हाॅटेलची जागा जाणार आहे. तेथे अजून काय हाेईल, हे सांगता येत नाही.

या रस्त्याचे काम मनसर ते सालई ४२ कि.मी. बारब्रीक कंपनी करीत आहे. ४०० कोटींचा खर्च यासाठी अपेक्षित आहे. पण रामटेकजवळ अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. रस्त्याचे काम सुरू हाेण्याआधी जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले नाही. त्यामुळे काम थांबले आहे. खिंडसीजवळ व नगारा तलाव क्षेत्रात काम थांबले आहे. नगारा तलावाजवळ बारई समाजाची जागा आहे. त्यामुळे हे काम अपूर्ण आहे. तसेच खिंडसीजवळ वन विभागाची जागा पाहिजे आहे. पण जागा न मिळल्याने तेथेही काम थांबले आहे. ही समस्या कधी सुटेल, काही सांगता येत नाही.