लोको पायलटने रेल्वे हॉस्पिटलमध्येच केली आत्महत्या; रेल्वे प्रशासनात एकच खळबळ

By नरेश डोंगरे | Updated: March 27, 2026 18:42 IST2026-03-27T18:41:38+5:302026-03-27T18:42:37+5:30

Nagpur : रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या एका लोको पायलटने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी ही घटना उघड झाल्यानंतर रेल्वे प्रशासनात एकच खळबळ निर्माण झाली.

Loco pilot commits suicide in railway hospital; Railway administration in a state of shock | लोको पायलटने रेल्वे हॉस्पिटलमध्येच केली आत्महत्या; रेल्वे प्रशासनात एकच खळबळ

Loco pilot commits suicide in railway hospital; Railway administration in a state of shock

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या एका लोको पायलटने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी ही घटना उघड झाल्यानंतर रेल्वे प्रशासनात एकच खळबळ निर्माण झाली. सुधाकर चुनारकर (वय ५९) असे मृत लोको पायलटचे नाव असून ते (ताडाली) चंद्रपूरचे रहिवासी असल्याची माहिती आहे. 

रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चुनारकर हे ताडाली, चंद्रपूर रेल्वे मुख्यालयात कार्यरत होते. दोन तीन दिवसांपूर्वी बाथरूममध्ये पडल्याने त्यांना दुखापत झाली होती. त्यामुळे ते उपचारासाठी रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यांनी हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट रूम घेतली होती. त्यांच्या एका नातेवाईकांचे निधन झाल्याचे वृत्त कळाल्यामुळे आज सकाळी त्यांची पत्नी गावाकडे निघून गेली. दुपारी ३ ते ४ च्या सुमारास हॉस्पिटल स्टाफने चुनारकर यांच्या रुममध्ये पाहणी केली असता चुनारकर गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले. ही माहिती हॉस्पिटल स्टाफकडून वरिष्ठांना कळताच एकच खळबळ निर्माण झाली. माहिती कळताच विभागीय व्यवस्थापक विनायक गर्ग यांच्यासह अनेकांनी तिकडे धाव घेतली. सदर पोलिसांसह चुनारकर यांच्या नातेवाईकांनाही कळविण्यात आले. 

आत्महत्येचे कारण अंधारात

निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले चुनारकर यांनी आत्महत्या का केली, असा प्रश्न आहे. या संबंधाने पोलिसांकडून ठोस माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र, चुनारकर यांना अनेक व्याधी होत्या. त्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. वृत्त लिहिस्तोवर या संबंधाने सविस्तर माहिती उपलब्ध झाली नव्हती.
 

Web Title : रेलवे अस्पताल में लोको पायलट ने की आत्महत्या; प्रशासन में हड़कंप

Web Summary : नागपुर के रेलवे अस्पताल में भर्ती एक लोको पायलट सुधाकर चुनारकर ने फांसी लगाकर आत्महत्या कर ली। वह गिरने से लगी चोटों का इलाज करा रहे थे। घटना से रेलवे अधिकारियों में हड़कंप मच गया; कारण अज्ञात है।

Web Title : Loco Pilot Commits Suicide in Railway Hospital; Uproar in Administration

Web Summary : A loco pilot, Sudhakar Chunarkar, admitted to a railway hospital in Nagpur, committed suicide by hanging. He was being treated for injuries sustained in a fall. The incident caused a stir among railway officials; the reason is currently unknown.