शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्स देणार मेट्रो रेल्वेला कर्ज

By admin | Updated: December 3, 2015 03:35 IST

जर्मनीनंतर आता फ्रान्स मेट्रो रेल्वेला कर्ज देण्यास तयार झाला आहे. फ्रान्सची वित्तीय संस्था ‘एएफडी’ मेट्रो रेल्वेला १३० दशलक्ष युरो अर्थात ९०० कोटी रुपये कर्ज देण्याचा करार मे महिन्यात करणार आहे.

९०० कोटींचा मेमध्ये करार : एएफडी चमूतर्फे पाहणीनागपूर : जर्मनीनंतर आता फ्रान्स मेट्रो रेल्वेला कर्ज देण्यास तयार झाला आहे. फ्रान्सची वित्तीय संस्था ‘एएफडी’ मेट्रो रेल्वेला १३० दशलक्ष युरो अर्थात ९०० कोटी रुपये कर्ज देण्याचा करार मे महिन्यात करणार आहे. ‘एएफडी’च्या तीन सदस्यीय चमूने बुधवारी प्रकल्पाची पाहणी केली. या चमूत ‘एएफडी’च्या प्रकल्प समन्वयक ज्युलिएट ले पेन्नेरर, प्रकल्प व्यवस्थापक प्रिसले दकोनिक आणि अर्नाड डॉफिन यांचा समावेश आहे. पत्रपरिषदेत ज्युलिएट ले पेन्नेरर म्हणाल्या, मे २०१६ मध्ये कर्जासाठी अंतिम करार करण्यात येईल. व्याजदर बाजारभावानुसार राहील. नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित म्हणाले, फ्रान्सची चमू दोन दिवसांपासून नागपुरात आहे. जर्मनीही या प्रकल्पासाठी ५०० दशलक्ष युरो अर्थात ३८०० कोटी रुपये कर्ज देणार आहे. जर्मनीची ‘केएफडब्ल्यू बँके’ची चमू आॅक्टोबरमध्ये नागपुरात आली होती. या कर्जाबाबत बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांमध्ये चर्चा सुरू आहे. १५ डिसेंबरपर्यंत कर्जाला मंजुरी मिळेल. उर्वरित १३० दशलक्ष युरो कर्जासाठी दोन दिवसांत फ्रान्सच्या एएफडी चमूसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. याप्रकारे मेट्रो रेल्वेसाठी एकूण ६३० दशलक्ष युरो कर्जाची गरज पूर्ण होणार आहे. या प्रकल्पात महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचा वाटा आहे. बजेटमधून मेट्रो रेल्वेला आर्थिक पुरवठा करण्यात येत असून त्याद्वारे प्रकल्पाचे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)७७ टक्के जमिनीचे अधिग्रहणदीक्षित म्हणाले, मेट्रो रेल्वेसाठी ७७ टक्के जमिनीचे अधिग्रहण झाले आहे. उर्वरित प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. काही जमीन रेल्वेकडून तर ३.५ हेक्टर खासगी जमीन घेण्यात येणार आहे. जमीन अधिग्रहणाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. वर्धा रोडवर काम सुरू होणारदीक्षित म्हणाले, विमानतळ ते सीताबर्डीपर्यंतचे काम लवकरच सुरू होणार आहे. प्राईड हॉटेलसमोरून काम सुरू होईल. यासाठी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहतूक विभागाला पत्र दिले आहे. मंजुरी मिळताच काम सुरू होईल.आॅयकॉनिक टॉवरच्या डिझाईनसाठी स्पर्धासीताबर्डी, मुंजे चौकात उभारण्यात येणाऱ्या आॅयकॉनिक टॉवरच्या आर्किटेक्चरल डिझाईनसाठी आंतरराष्ट्रीयस्तराच्या आर्किटेक्टस्मध्ये स्पर्धा घेण्यात येत आहे. यात १३ आर्किटेक्टस्चा सहभाग आहे. ते आपले डिझाईन ८ जानेवारीला सादर करतील. यातून सर्वोत्तम डिझाईनची निवड टॉवर उभारणीसाठी केली जाईल. टॉवर तयार झाल्यानंतर येथे येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगसाठी लगतच्या मैदानाचा ताबा ‘एनएमआरसीएल’ला मिळाला आहे. खापरी आणि न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशनचे काम सुरू आहे. जमिनीवरील कामे, पूल आणि सुरक्षा भिंतीचे तसेच कार शेडचे काम सुरू आहे. डेपोचे डिझाईन करण्यात येत आहे. वर्षभरात अनेक बदल : ज्युुलिएटजुलिएट म्हणाल्या, एक वर्षापूर्वी नागपुरात आलो होतो. त्यावेळी मेट्राचे काम नासुप्रकडे होते. तेव्हा ‘एनएमआरसीएल’ कंपनी नव्हती. एका वर्षात अनेक बदल झाले आहेत. कंपनीची चमू ऊर्जेने काम करीत आहे. कामाची गती पाहता प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्ण होईल. येथील लोक वाहतुकीसाठी आपल्या वाहनांचा उपयोग करतात. त्यांना मेट्रो रेल्वेकडे आकर्षित करावे लागेल. एएफडी बेंगळुरू आणि कोच्ची मेट्रो प्रकल्पाशी जुळली आहे. बेंगळुरूमध्ये भूमिगत रेल्वे धावणार आहे. येथे मातीची समस्या आहे. तुलनात्मकरीत्या नागपुरात एलिव्हेटेड मेट्रोची उभारणी सोपी आहे.