शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रकाश बाबा आमटे’ चित्रपटातून मानवतेचा दीप तेवावा

By admin | Updated: January 25, 2015 00:53 IST

‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा तो लोकांना इतका आवडेल, असे वाटले नव्हते. आता हा सिनेमा आंतराष्ट्रीय स्तरावरही वाखाणल्या जात असून यानिमित्ताने बाबा आमटेंचे

दिग्दर्शक समृद्धी पोरे : ‘डॉ़ प्रकाश बाबा आमटे’ चित्रपटातील कलावंतांचा सत्कारनागपूर : ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा तो लोकांना इतका आवडेल, असे वाटले नव्हते. आता हा सिनेमा आंतराष्ट्रीय स्तरावरही वाखाणल्या जात असून यानिमित्ताने बाबा आमटेंचे कार्य विविध देशातल्या नागरिकांना अनुभवता येत आहे. प्रकाश आमटे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्वच जगात बदल करू शकते. त्यांनी जे माणूस जोडण्याचे कार्य हातात घेतले त्यातूनच मानवतेचा दीप अखंड तेवत राहावा, असे मत या चित्रपटाच्या दिग्दर्शक समृद्धी पोरे यांनी व्यक्त केले. गुलमोहर बहुउद्देशीय संस्था आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने समृद्धी पोरे यांच्या प्रकट मुलाखतीचा आणि या चित्रपटातील वैदर्भीय कलावंतांच्या सत्कार समारंभाचे आयोजन विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलात करण्यात आले. याप्रसंगी पोरे बोलत होत्या. मुळात या चित्रपटात असणारी सर्वच पात्रे खरी आहेत. त्यामुळेच यात जाणीवपूर्वक कथेत काही बदल करण्यात आला नाही. हेमलकसा येथे राहणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या भरवशावर भाऊंचे कार्य मोठे झाले. स्वत:ची प्रसिद्धी न करता निरपेक्षतेने काम करणारी माणसे येथेच पाहिली. या चित्रपटातून भाऊंचे कार्य समोर आणण्याचे काम करण्यासाठी ईश्वराने माझी निवड केली हीच माझी भूमिका आहे. मी चित्रपटासाठी जाण्यापूर्वी भाऊंकडे आमीर खान प्रॉडक्शनचे लोक गेले होते. पण भाऊंनी सर्व हक्क मला दिले. चित्रपटातून अनेक बाबी दाखविणे शक्य नसल्याने काही राहून गेले आहे. पण तरीही प्रकाश आमटेंना हा चित्रपट आवडला. यावेळी वैदर्भीय कलावंत विनोद राऊत, पूजा पिंपळकर, मुग्धा देशकर, प्रसाद ढाकूलकर, संजय वलिवकर, योगेश राऊत, अतुल महाले, रवी पाटील, भरतरंगारी, खेमराज भोयर, संतोष चोपडे, शेषराव जिभकाटे, राहुल मेश्राम, संजीव रामटेके यांचा सत्कार करण्यात आला़ डॉ़ गिरीश गांधी यांच्या हस्ते समृद्धी पोरे यांना सन्मानपत्र बहाल करण्यात आले़ यावेळी अ़भा़ मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रमोद भुसारी, नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे, डॉ़ नरेश गडेकर, श्रद्धा तेलंग उपस्थित होते़ सत्कार सोहळ्यानंतर श्रीकांत आगलावे यांच्या ज्ञानमंदिर प्लॅटफार्म स्कूल व राम इंगोले यांच्या विमल आश्रम शाळेतील विद्यार्थी, मातृसेवा संघ नर्सिंग स्टाफ व पंचवटी वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी चित्रपटाचा विशेष खेळ आयोजित करण्यात आला होता़ (प्रतिनिधी)