शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदायी योजना ‘आॅक्सिजन’वर

By admin | Updated: May 20, 2014 01:02 IST

राज्यातील गोरगरीब रु ग्णांना दर्जेदार उपचार देण्याचे स्वप्न दाखविणारी ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आॅक्सिजनवर आहे.

सुमेध वाघमारे / नागपूर

राज्यातील गोरगरीब रु ग्णांना दर्जेदार उपचार देण्याचे स्वप्न दाखविणारी ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आॅक्सिजनवर आहे. बिले थकल्याने पुरवठादाराने औषध देणे बंद केले आहे. रुग्णालयाच्या दरकरारावरही शस्त्रक्रियांना लागणारी औषधे व साहित्य नाही. यामुळे मागील दीड महिन्यापासून हृदयावरील शस्त्रक्रिया बंद पडल्या आहेत. विशेष म्हणजे, सुपरच्या या योजनेतील २५० क्लेमला मंजुरी मिळाली आहे. यातून १ कोटी ४८ लाख ७७ हजार रुपये रुग्णालयाच्या तिजोरीत जमा झाले आहे; असे असताना औषध पुरठादाराचे थकीत असलेले ९३ लाख रुपये न देता रुग्णांना वेठीस धरण्यात येत आहे.या योजनेतील लाभार्थी रेखा राजेश भुजाडे (४२) हिला वेळेवर ‘पेसमेकर’ उपलब्ध करून देण्यात आले नाही. यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यानंतरही या रुग्णालयाची स्थिती सुधारलेली नाही. दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने प्रायोगिक तत्त्वावर आठ जिल्ह्यांत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. या योजनेला पहिल्या टप्प्यात चांगले यश मिळाले. त्यामुळे ही योजना २१ नोव्हेंबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली. या योजनेत ९२७ आजारांचा समावेश आहे. यासाठी तीन शासकीय रुग्णालयांसह ३२ खासगी रुग्णालयांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली. यात मेडिकल रुग्णालयाशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटीमध्ये ही योजना मात्र नियोजन नसल्याने ‘जीवघेणी’ ठरत आहे.