शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीसाठी अपहरण करणाऱ्याला जन्मठेप

By admin | Updated: April 6, 2017 02:24 IST

दीड लाख रुपये खंडणीसाठी दोन तरुणांचे अपहरण करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली.

सत्र न्यायालय : विविध कलमांतर्गत गुन्हा सिद्ध नागपूर : दीड लाख रुपये खंडणीसाठी दोन तरुणांचे अपहरण करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश एस. एस. दास यांनी हा निर्णय दिला. ही घटना नंदनवन पोलिसांच्या हद्दीत घडली होती. ललित विलास ठाकरे (२४) असे आरोपीचे नाव असून तो विश्वकर्मानगर येथील रहिवासी आहे. आरोपीला भादंविच्या कलम ३६४(अ) अंतर्गत जन्मठेप व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ५ महिने कारावास, कलम ३८४ अंतर्गत २ वर्षे सश्रम कारावास व ३००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने कारावास, कलम ३२७ अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास तर, कलम ३४२ अंतर्गत ६ महिने साधा कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. सम्यक अनिरुद्ध बनकर (१७) असे फिर्यादीचे नाव असून तो मीरे ले-आऊट, भांडे प्लॉट येथील रहिवासी आहे. ५ सप्टेंबर २०१२ रोजी रात्री ९ च्या सुमारास आरोपीने बनकर व त्याच्या मित्राचे १ लाख ५० हजार रुपये खंडणीसाठी अपहरण करून त्यांना जुना सक्करदऱ्यातील संतोषी मातानगरस्थित खोलीत डांबून ठेवले होते. तसेच, त्यांना जबर मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली होती. शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता माधुरी मोटघरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)