शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचे कातडे जप्त

By admin | Updated: November 16, 2015 23:59 IST

चौघांना अटक : चिपळूणमध्ये सापळा रचून पोलिसांची कारवाई

चिपळूण : शहरात गुहागर बायपास मार्गावर बिबट्याचे कातडे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली आणि लागलीच सापळा रचून पोलिसांनी बिबट्याच्या कातड्यासह चार तरुणांना ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी रात्री १०.३० वाजता करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.बिबट्याच्या कातड्याची विक्री होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश मते, हवालदार गणेश नाले, गगनेश पटेकर, सुशांत कांबळे यांनी सापळा रचला. एक बोगस गिऱ्हाईक पाठवण्यात आले. पाच लाखांच्या आमिषाने अमोल सखाराम पालकर (३९, रा. पंडववाडी- पिंपळी खुर्द), मुनावर शहाबाज खान (२६, रा. वेहळे) व सुनील कृष्णा जड्याळ (रा. कासे, ता. संगमेश्वर) हे बिबट्याचे कातडे घेऊन आले. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले.हा बिबट्या सुधाकर नेवरेकर (२६, रा. मुर्तवडे- कातळवाडी) याने मारल्याचे या आरोपींनी सांगितल्यामुळे पोलिसांनी नेवरेकर यालाही तत्काळ ताब्यात घेतले. मुर्तवडे कझर येथे ५ ते ६ महिन्यांपूर्वी आपण रात्री बिबट्याची शिकार केल्याचे त्याने पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या समोर कबूल केले. हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला होता. त्याचे वय ५ ते ६ वर्षे असावे, असे फिरत्या पथकाचे परिक्षेत्र वन अधिकारी शहाजी पाटील यांनी सांगितले.वन खात्याचे परिक्षेत्र वन अधिकारी जी. एन. कोल्हे, भरारी पथकाचे परिक्षेत्र वनअधिकारी शहाजी पाटील, वनपाल आर. बी. पताडे, राजश्री कीर, वनरक्षक तौफिक मुल्ला, एम. जी. पाटील, जितेंद्र बारशिंग यांच्या ताब्यात कातडे देण्यात आले आहे. रितसर पंचनामा केल्यानंतर वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. संशयितांना दि. २१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (प्रतिनिधी)++++मुर्तवडेच्या तरुणाने केली शिकारपूर्ण वाढ झालेल्या बिबट्याची शिकार करणारा सुधाकर हा मुर्तवडेचे माजी उपसरपंच बबन नेवरेकर यांचा मुलगा असून ते सातत्याने शिकार करतात. आपल्याला बॅटरीच्या प्रकाशझोतात ९ बिबटे दिसले. एक बिबट्या आपल्या दिशेने आला. त्याच्यावर आपण बार काढला व आपण झाडावर चढलो. यासाठी मार्गताम्हाणे येथील एका व्यक्तीची १२ बोअरची बंदूक आपण वापरल्याचेही सुधाकर याने सांगितले. नेवरेकर सराईत शिकारी असल्यानेच त्याने दोन काडतुसाच्या सहाय्याने हा बिबट्या मारला. एक गोळी बिबट्याच्या पोटावर तर दुसरी त्याच्या पायात घुसल्याचे कातड्यावरुन दिसते.