शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
2
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
3
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
4
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
5
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
6
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
7
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
8
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
9
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
10
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
11
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
12
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
13
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
14
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
15
Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS
16
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
17
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
18
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
19
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
20
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

देवलापारचे ठाणेदार सक्तीच्या रजेवर

By admin | Updated: May 22, 2014 02:18 IST

वरघाट येथील वृद्धाच्या आत्महत्येस पोलिसांना दोषी धरत निलंबित

करवाही : वरघाट येथील वृद्धाच्या आत्महत्येस पोलिसांना दोषी धरत निलंबित करण्याच्या मागणीसाठी सोमवारी देवलापार पोलीस ठाण्याला घेराव व नागपूर-जबलपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्याची दखल घेत ठाणेदाराला सक्तीच्या रजेवर पाठविले तर अन्य दोघांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली.

रामलाल आत्राम (६३, रा. वरघाट, ता. रामटेक) असे मृत वृद्धाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी सहायक पोलीस उपनिरीक्षक नारायण देवगडे, शिपाई राजेश पाली यांच्यासह अन्य पोलीस मोटरसायकलींवर वरघाट येथे आले होते. यातील एकाने रामलालला कट मारला. त्यामुळे रामलालने पोलिसांना शिवीगाळ केली. तो दारू पिऊन होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणून वैद्यकीय तपासणीसाठी नेले. मात्र रक्तदाब त्यातच अतिदारू पिला असल्याने रामलालची वैद्यकीय तपासणी न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. तेथून रामलालला पोलीस ठाण्यात आणून बसण्यास सांगितले. अटक केली नव्हती. रात्र झाल्याने पोलिसांनी दुसर्‍या दिवशी सकाळी गावाला जाण्यास सांगितले. परंतु, रात्री २ वाजताच्या सुमारास रामलाल हा पायी गावात गेला.

पोलीस ठाण्यातून रामलाल कुठे गेला, याचा शोध घेत पोलीस त्याच्या गावी गेले असता तो घरी दिसल्याने पोलिसांनी त्याला विचारणा केली. मात्र पोलिसांच्या वारंवार होणार्‍या अशा त्रासामुळे धास्तावलेल्या रामलालने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमुळे पोलिसांवर रोष निर्माण होऊन प्रकरण तापले.

आत्महत्येस पोलिसांना कारणीभूत धरत सोमवारी दुपारच्या सुमारास संतप्त ग्रामस्थांनी रामलालचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवला व रास्ता रोको आंदोलन करायला सुरुवात केली. रोडवर टायर जाळले. नारायण देवगडे, राजेश पाली यांच्यासह इतर सहभागी पोलिसांना निलंबित करण्याची मागणी ग्रामस्थांनी रेटून धरली होती. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपक साळुंके यांनी नागरिकांना दोषी असलेल्या पोलिसांची चौकशी करण्यात येईल.

त्यात ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल तसेच ठाणेदार हृदयनारायण यादव यांच्या बदलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले. यानुसार ठाणेदार यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे तर सहायक पोलीस उपनिरीक्षक नारायण देवगडे आणि शिपाई राजेश पाली यांची मुख्यालयात बदली केली. (वार्ताहर)