शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनासाठी जमीन देणाऱ्यांनाही हवाय लाभ

By admin | Updated: July 8, 2014 01:16 IST

प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी ज्यांच्या शेतजमिनी घेण्यात आल्या त्यांनाही गोसेखुर्द पॅकेजचा लाभ मिळावा, अशी मागणी बोथली गावातील २३ गावकऱ्यांनी विभागीय उपायुक्तांकडे केली.

गोसेखुर्द प्रकल्प : गावकरी भेटले उपायुक्तांनानागपूर : प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी ज्यांच्या शेतजमिनी घेण्यात आल्या त्यांनाही गोसेखुर्द पॅकेजचा लाभ मिळावा, अशी मागणी बोथली गावातील २३ गावकऱ्यांनी विभागीय उपायुक्तांकडे केली.गावकऱ्यांनी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (पुनर्वसन) एस.जी. गौतम आणि जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके यांना निवेदन दिले. सरकारदरबारी या मागणीचा पाठपुरावा करू, असे आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिल्याचे गावकऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.गोसेखुर्द प्रकल्पात गेलेल्या ८५ गावांचे ६४ गावाठाणांवर पुनर्वसन करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ८८४.०९ हेक्टर शेतजमीन संपादित केली आहे. महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९९९ नुसार प्रकल्पबाधितांप्रमाणेच त्यांच्या पुनर्वसनासाठी ज्यांची शेती घेतली जाते ते सुद्धा प्रकल्पबाधित ठरतात. त्यामुळे ज्यांची शेती प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी घेण्यात आली त्यांचाही शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजवर हक्क आहे. मात्र अद्याप त्यांना एक रुपयाही मिळाला नाही.गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतजमीन संपादित करताना शासनाने फक्त मोबदला दिला. पण २०१३ मध्ये शासनाने जाहीर केलेल्या सुधारित पॅकेजचा लाभ त्यांना मिळाला नाही. विभागीय आयुक्तांनी पॅकेजची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र प्रकल्पबाधित ठरत असतानाही प्रशासनाकडून या शेतकऱ्यांसोबत आतापर्यंत पॅकेजच्या लाभासंदर्भात कोणताही पत्रव्यवहार करण्यात आला नाही. शासनाच्या धोरणानुसार जर ते प्रकल्पबाधित आहेत तर आम्हाला का डावलण्यात आले, असा सवाल या गावकऱ्यांनी केला. शिष्टमंडळाचे नेतृत्व गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे यांनी केले. भंडारा जिल्ह्यात पुनर्वसन अधिकाऱ्याची जागा रिक्त असल्याने तेथील पॅकेजची अंमलबजावणी संथगतीने होत असल्याचा आरोप त्यांनी केला. (प्रतिनिधी)