शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

लकडगंज पोलिसांनी पकडला ४९ लाखाचा सुगंधित तंबाखु ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:16 IST

रात्री पोहोचली एफडीएची टीम नागपूर : लकडगंज पोलिसांनी राज्यात प्रतिबंधित असलेला ४९ लाखाचा सुगंधित तंबाखू पकडला आहे. ही कारवाई ...

रात्री पोहोचली एफडीएची टीम

नागपूर : लकडगंज पोलिसांनी राज्यात प्रतिबंधित असलेला ४९ लाखाचा सुगंधित तंबाखू पकडला आहे. ही कारवाई बुधवारी सकाळी ९.३० वाजता वर्धमाननगरात करण्यात आली. पोलिसांना सकाळी ९ वाजता ट्रक क्रमांक सीजी, ०४-जेसी १०११ मध्ये लाखो रुपयांचा सुगंधित तंबाखू शहरात आणल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वर्धमाननगरात ट्रकचा शोध घेण्यात आला. यावेळी त्यात माझा, ईगल, गोल्ड आणि रिमझिम ब्रँडचा तंबाखू आढळला. हा माल ३ हजार ३५७ किलोचा असून त्याची किंमत ४९ लाख १५ हजार ३७० रुपयांचा आहे. याची सुचना अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांना देण्यात आली. परंतु एफडीएची टीम रात्री ८ वाजता लकडगंज ठाण्यात पोहोचली. हा माल राजा नावाच्या व्यावसायिकाचा असल्याची चर्चा आहे. परंतु वाडीच्या नितीन कांबळे या व्यक्तीने हा माल त्याचा असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर पोलिसांनी एफडीएचे निरीक्षक विनोद धवड यांच्या तक्रारीवरून विविध कलमांतर्गत अन्न सुरक्षा कायदा २००६ नुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई लकडगंजचे निरीक्षक पराग पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विलास पाटील, संजय बांगडकर, राम कैलाश यादव, वासुदेव जयपूरकर, फिरोज खान यांनी केली.

............

सँपल घेऊन ट्रक केला सील

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी लकडगंज ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर ट्रकमधून जप्त केलेल्या मालाचे चार सँपल घेतले. त्यासोबतच सुगंधित ट्रकच्या तस्करीत पकडलेल्या ट्रकला सील केले आहे.

............