शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या दबावाखालील पृथ्वी

By admin | Updated: July 15, 2016 03:04 IST

मानवाच्या निसर्गावरील आक्रमणाबाबत अनेक दशकांपासून चिंता व्यक्त केली जात आहे.

रमण विज्ञान केंद्रात ‘प्लॅनेट अंडर प्रेशर’ : मानवाच्या तथाकथित संकल्पनेतून बिकटतेकडे वाटचाल नागपूर : मानवाच्या निसर्गावरील आक्रमणाबाबत अनेक दशकांपासून चिंता व्यक्त केली जात आहे. तरीही वसुंधरेची वाटचाल दिवसेंदिवस मानवाच्या तथाकथित विकासात्मक संकल्पनेतून बिकटतेकडे होत आहे. बेसुमार जंगलतोड, वाढती लोकसंख्या, शहरीकरण, अतिऔद्योगिकीकरण, वातानुकूलित उपकरणांचा उपयोग, वाहनांचा वाढता वापर आणि औष्णिक ऊर्जानिर्मिती आदी अनेक कारणांच्या दबावाखाली पृथ्वी आली आहे. याबाबत जनजागृती निर्माण करून त्या दृष्टीने पावले उचलणे काळाची गरज असल्याची माहिती देणारे प्रदर्शन ‘प्लॅनेट अंडर प्रेशर’ रमण विज्ञान केंद्रात सुरू झाले आहे. या प्रदर्शनात विविध थ्रीडी मॉडेल्स ठेवण्यात आली आहेत. माहिती देणारे पॅनल्स, (माहिती पटल) व्हिडिओ, ‘अ‍ॅनिमेशन डेस्क’ याद्वारे विद्यार्थ्यांना या विषयाची माहिती दिली जात आहे. प्रदर्शनाच्या संदर्भात अधिक माहिती देताना रमण विज्ञान केंद्राचे अधिकारी अभिमन्यू भेलावे म्हणाले, विकासाच्या नावाखाली शहरीकरण आणि औद्योगिकीकरण वाढत आहे. आज वीज नसेल तर हवा, पाणी आणि अन्न बंद अशी स्थिती महानगरांची झाली आहे, हे आजचे वास्तव आहे. या सर्वांचा दबाव पृथ्वीवर पडत आहे. सूर्यापासून जी उष्णता मिळते पृथ्वी ती काही प्रमाणात शोषून घेते व थोड्या प्रमाणात बाहेर टाकते. परंतु आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने व कार्बनडायआॅक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे शोषलेले तापमान पुरेशा प्रमाणात टाकण्यात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत असून ‘ग्लोबल वॉर्मिंग’ला सामोरे जावे लागत आहे. दुसरे म्हणजे, पृथ्वीला थंड कसे राखायचे हाही एक दबावाचा भाग आहे. हा दबाव कमी करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी वैकल्पिक साधने काय, या सर्वांची माहिती व्हावी, लोकांमध्ये जनजागृती व्हावी, विशेषत: विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ते घराघरात पोहचावे यासाठी हे प्रदर्शन आहे.