शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाचपावलीत तरुणाची हत्या

By admin | Updated: June 5, 2017 01:44 IST

दोन गटात गेल्या चार महिन्यांपासून धुमसत असलेल्या वादाचे पर्यवसान सशस्त्र हाणामारीत झाले.

सशस्त्र हाणामारीत आरोपीसुद्धा जखमी    डोक्यात गोळी घातली आरोपी फरार    चार महिन्यापासून धुमसणाऱ्या वादाचे पर्यवसानलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन गटात गेल्या चार महिन्यांपासून धुमसत असलेल्या वादाचे पर्यवसान सशस्त्र हाणामारीत झाले. तशात प्रतिस्पर्धी हल्लेखोरांनी मोहम्मद आबिद (वय २४) नामक तरुणाच्या डोक्यात गोळी घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर, त्याच्या साथीदारांसह अन्य काही आरोपी या सशस्त्र हाणामारीत जखमी झाले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ७.३० च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड थरार अन् तणाव निर्माण झाला होता. मोहम्मद आबिद आणि आरोपी गुड्डू ऊर्फ आसिफ शेख या दोघांच्या गटात अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहे. विटाभट्टींसह अवैध धंद्यांशी ते जुळले आहेत. स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्यांनी एकमेकांवर हल्ले करणे, हाणामाऱ्या करून वाहने फोडणे,असे प्रकारही केले आहे. महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना आसिफच्या घरावर जोरदार हल्ला झाला होता. त्याच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली होती. त्यात आबिदचा पुढाकार असल्याचे समजल्यापासून या दोघांमधील वाद अधिकच तीव्र झाला होता. या पार्श्वभूमीवर, रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास आसिफ आणि आबिद या दोघांची वाहने १० नंबर पुलावर समोरासमोर आली. एकमेकांना साईड देण्याऐवजी त्यांनी परस्परांच्या वाहनांना जोरदार धडक मारली. यावेळी त्यांच्यात मोठा वाद झाला. ‘छोडेंगे नही, देख लेंगे’, अशी धमकी देत दोघेही यावेळी निघून गेले. त्यानंतर दोघांनीही शस्त्र आणि साथीदारांची जमवाजमव केली. एकमेकांना बघून घेण्याची भाषा वापरणारे दोन्ही गटातील गुंड रात्री ७.३० च्या समोर लष्करीबागेत १० नंबर पुलाजवळच्या नवा नकाशा परिसरात (किदवई ग्राऊंडजवळ) समोरासमोर आले. त्यांनी प्रारंभी शिवीगाळ, बाचाबाची आणि नंतर सशस्त्र हाणामारी केली. त्यानंतर आसिफने स्वत:जवळचे पिस्तूल काढले आणि तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी आबिदच्या डोक्यात शिरल्याने तो जागीच ठार झाला तर, त्याच्या एका मित्राला गोळीची जखम झाली. आबिदच्या अन्य साथीदारांसोबत आरोपींचे काही साथीदारही गंभीर जखमी झाले. आसिफने गोळी घालून आबिदला ठार मारताच आबिदचे साथीदार दहशतीत आले. ते पळून गेले. या हल्ल्यात आबिदच्या एका मित्राला गोळीची जखम झाल्याचे सांगितले जाते. मात्र, पोलिसांकडून तशी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. दुसरीकडे आबिदच्या अन्य काही साथीदारांसोबत आरोपी आसिफचे काही साथीदारही गंभीर जखमी झाले.वर्चस्वासाठी केला आसिफने गेम आरोपी आसिफ आणि मृत आबिद हे दोघेही सामाजिक संघटनेच्या नावाखाली वेगवेगळ्या समूहाशी जुळले आहेत. काही राजकीय नेत्यांसोबतही त्यांची उठबस होती. आरोपी आसिफ हा त्या भागातील युवक काँग्रेसचा पदाधिकारी आहे. गुंडगिरीवर पांघरुण घालण्यासाठी आणि आपला दबदबा निर्माण करण्यासाठी तो राजकीय पांघरुण वापरतो. सोबतच गेल्या अनेक दिवसांपासून या भागात वर्चस्व निर्माण करण्याचा तो प्रयत्न करीत आहे. आसिफ आबिदचा गेम करण्याची संधी शोधत होता. अखेर रविवारी त्याने डाव साधला.