शहरं
Join us  
Trending Stories
1
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
2
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
3
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
6
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
7
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
8
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
9
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
10
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
11
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
12
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
13
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
14
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
15
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
16
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
17
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
18
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
19
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
20
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

खोब्रागडेंची मृत्यूशी झुंज कायम

By admin | Updated: May 20, 2014 00:57 IST

पेट्रोल टाकून जिवंत पेटविलेल्या संजय निवृत्तीनाथ खोब्रागडे यांची दुसर्‍या दिवशीही मृत्यूशी झुंज कायम आहे. राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष सी. एल. थूल, रोहयो मंत्री नितीन

पेट्रोल टाकून पेटविलेले प्रकरण

नागपूर : पेट्रोल टाकून जिवंत पेटविलेल्या संजय निवृत्तीनाथ खोब्रागडे यांची दुसर्‍या दिवशीही मृत्यूशी झुंज कायम आहे. राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष सी. एल. थूल, रोहयो मंत्री नितीन राऊत व भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज सोमवारी मेडिकलला भेट देऊन खोब्रागडे यांच्या प्रकृतीची चौकशी केली. ९४ टक्के जळालेले खोब्रागडे यांना रविवारी मेडिकलच्या वॉर्ड क्र. १९ मधून वॉर्ड क्र. ४ मध्ये हलविण्यात आले. आज तिसर्‍या दिवशीही त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी सांगितले, खोब्रागडे सध्या उपचाराला साथ देत आहेत. मात्र, त्यांच्या मूत्र विसर्जनाचा अहवाल चिंताजनक आहे. त्यांचा पल्सरेट सध्या १०० ते १०४ वर स्थिरावला आहे. त्यांच्या आॅक्सिजनची मात्राही ९० ते ९५ पर्यंत स्थिरावली आहे. संजय यांच्या शरीराच्या कंबरेपासून वरचा भाग मोठ्या प्रमाणात भाजला आहे. त्यामुळे त्यांची त्वचा कडक झाली आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ नये म्हणून व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहे, परंतु तूर्तास त्याचा उपयोग नाही, असेही त्यांनी सांगितले. आज दिवसभरात अधिकारी आणि मंत्र्यांकडून खोब्रागडे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यात आली. यांच्यासोबतच भारिप बहुजन महासंघाचे मिलिंद पखाले, राष्ट्रवादीचे प्रकाश गजभिये, दलित पॅँथरचे प्रभारी राजेश लाडे आदींचा सहभाग होता. थूल यांनी गोंदिया जिल्ह्यातील प्रत्यक्ष घटनास्थळी देखील भेट देऊन वस्तुस्थितीची माहिती करून घेतल्याची माहिती आहे. मेडिकलचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. तिरपुडे हे वेळोवेळी रुग्णाची माहिती घेत आहेत.(प्रतिनिधी)