शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी सोडण्यासाठी खरबडे हायकोर्टात

By admin | Updated: August 3, 2015 03:00 IST

डॉ. सुरेंद्र खरबडे यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील रोखे घोटाळ्याच्या चौकशीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

‘एनडीसीसी’ बँक घोटाळा : राजकीय दबाव असल्याची माहितीनागपूर : डॉ. सुरेंद्र खरबडे यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील रोखे घोटाळ्याच्या चौकशीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिवाणी अर्ज दाखल केला असून त्यावर सोमवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. डॉ. खरबडे चौकशी सोडणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने काही दिवसांपूर्वीच प्रकाशित केले होते. खरबडे यांनी यासंदर्भात १५ जुलै रोजी विभागीय सहकार सहनिबंधकांना पत्र पाठविल्याचे कळले आहे. बँकेतील सुमारे १४९ कोटी रुपयांच्या रोखे घोटाळ्याची महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा-१९६० मधील कलम ८८ अंतर्गत फेरचौकशी करण्यात येत आहे. घोटाळ्यातील आरोपींमध्ये बँकेचे माजी अध्यक्ष आमदार सुनील केदार, माजी महाव्यवस्थापक अशोक चौधरी (नागपूर), रोखे दलाल संजय अग्रवाल, केतन सेठ, सुबोध भंडारी, कानन मेवावाला, नंदकिशोर त्रिवेदी (सर्व मुंबई), अमित वर्मा (अहमदाबाद), महेंद्र अग्रवाल, श्रीप्रकाश पोद्दार (कोलकाता) आदींचा समावेश आहे.सुरुवातीला यशवंत बागडे यांनी घोटाळ्याची चौकशी केली होती. त्यांनी केदार व इतर आरोपींवर १३ पैकी ५ आरोप सिद्ध होत असल्याचा अहवाल दिला होता. याविरुद्ध केदार यांनी सहकारमंत्र्यांकडे अपील केले होते. १४ जून १०१४ रोजी सहकारमंत्र्यांनी अपील मंजूर करून प्रकरण फेरचौकशी करण्यासाठी परत पाठविले होते.त्यानुसार १६ जून २०१४ रोजी खरबडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. खरबडे यांनी चौकशीला सुरुवात केली पण, आरोपी कोणत्याना कोणत्या कारणामुळे चौकशीला विलंब करीत आहेत. खरबडे यांना दूरध्वनीवरून धमक्या दिल्या जात आहेत. लाच देण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच, चौकशीसाठी येणाऱ्या खर्चाची परतफेड शासनाकडून वेळेवर केली जात नसल्याचे कळले आहे. आरोपींकडून सतत त्रास देण्यात येत असल्यामुळे खरबडे मानसिक तणावात आले आहेत.त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर होत आहे. परिणामी त्यांनी चौकशीच्या जबाबदारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी मोबाईलवरून संपर्क साधला असता खरबडे यांनी कॉल स्वीकारला नाही.(प्रतिनिधी)