शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
2
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
3
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
4
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
5
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
6
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
7
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
8
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
9
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
10
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
11
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
12
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
13
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
14
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
15
Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS
16
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
17
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
18
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
19
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
20
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण अधिकारी सापडले कात्रीत

By admin | Updated: June 17, 2014 00:43 IST

जिल्हा विद्युतीकरण समन्वय बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत विद्युत महावितरण अधिकारी खासदार व आमदारांच्या कात्रीत सापडले होते. भारनियमनविषयी

समन्वय बैठकीत केवळ चर्चा : भारनियमनाचा मुद्दा गाजला
अमरावती : जिल्हा विद्युतीकरण समन्वय बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत विद्युत महावितरण अधिकारी खासदार व आमदारांच्या कात्रीत सापडले होते. भारनियमनविषयी तसेच विद्युत महावितरणाबद्दलच्या अनेक तक्रारींबाबत बैठकीत घमासान चर्चा झाल्याने महावितरण अधिकाऱ्यांना बोलणे सुचेनासे झाले होते.
खासदार आंनदराव अडसूळ यांच्या अध्यतेखाली झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार, माजी खासदार अंनत गुढे, विद्युत महावितरणाचे अधीक्षक अभिंयता दिलीप घुगल, इंडिया बुल्सचे व्यवस्थापक अमित पंचालवार, आमदार वीरेन्द्र जगताप, आमदार प्रवीण पोटे, आमदार केवलराम काळे, आमदार यशोमती ठाकूर, आमदार अभिजित अडसूळ, एमआयडीसी असोसिएयनचे अध्यक्ष राजेन्द्र भागलीया, विद्युत विभागाचे प्रमोद दहाट, व्ही.डी. मेंढे, किरण पातूरकर यांच्यासह आदी उपस्थित होते. या बैठकीत विविध मुद्दे असताना कोणत्या मुद्यावर आधी चर्चा करायची हाच प्रश्न पडला होता. चर्चेतील पहिला मुद्दा खासदारांनी वाचुन दाखविला. यामध्ये ग्राहकांच्या प्रत्येक वर्गवारीमध्ये दरवर्षी होणाऱ्या वाढीच्या प्रमाणात विद्युत वितरण व्यवस्थेतील पायाभूत सुविधा वाढ सुसंगत आहे काय, याबाबत माहिती देण्याचे मुद्दा ठेवण्यात आला. मात्र आपल्या जिल्ह्याला किती मेगावॅट विजेची आवश्यकता आहे. त्यावर विद्युत वितरण कंपनीने काय केले आणि पुढे काय करणार यावर विद्युत वितरण अधिकाऱ्यांचे मत ऐकून घेण्यात आले. जिल्ह्याला ५७५ मेगावॅट विजेची आवश्यकता आहे व आपल्याकडे ५०० मेगावॅट वीज उपलब्ध आहे. त्यावर जिल्ह्याचे काम चालू शकते, असे मत विद्युत महावितरणाचे अधिकाऱ्यांनी मांडले. मात्र तरीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी भारनियमन होत आहे, असा सवाल आमदारांनी उपस्थित केला. आमदारांनी आपआपल्या परिसरातील समस्या आवर्जून बैठकीत मांडल्या. वीज वितरणचे अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. एवढेच नव्हे तर स्वत: विद्युत महावितरणाच्या दारी जाऊन आपल्या समस्या माडंल्या. मात्र त्याकडेही लक्ष देण्यात आले नाही, अशी खंत त्यांनी बैठकीत व्यक्त केली. आमदारांच्याच समस्यांकडेच दुर्लक्ष केले जाते मग सामान्य नागरिकांच्या समस्या कश्या दूर होणार, असा सूर बैठकीत निघाला. शेतकऱ्यांच्या समस्या, शहरातील नागरिकांच्या वीज जोडणी तसेच वीज वितरणचे इनफ्रास्ट्रक्चर अशा एक ना अनेक मुद्यांवर घमासान चर्चा झाली. यावर विद्युत महावितरण अधिकाऱ्यांनी घोंगडे झटकण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळेपर्यंत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. अखेर विद्युत वितरणने वीज पुरवठ्याबद्दल उपाययोजना कराव्या, असे निर्देश खासदार अडसुळांनी दिले. (प्रतिनिधी)