शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

काटवल, खापरखुटी, चंदनबटवा, कुंजीरचा मेवा; भरपावसात सजला रानभाज्यांचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 10:50 IST

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय व प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने रविनगर शासकीय वसाहतीच्या मैदानात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देश्रावणातील भाज्यांनी वाढवा प्रतिकारशक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्रावण महिन्यात रानावनातून मिळणाऱ्या रानभाज्या व रानफळे म्हणजे निसर्गाने दिलेला ठेवाच आहे. या रानभाज्या खायला जेवढ्या रुचकर तेवढ्याच रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अत्यंत फायदेशीर. अळु, अंबाडी, काटवल, चिवई, गावरानी कोहळे, सुरण, गुळवेल, शेवगा, खापरखुटी, चंदनबटवा, समुद्री घोष, बांबू आस्ते, केना, कुंजीर या भाज्यांची चवच वेगळी. शहरवासीयांसाठी हा तसा दुर्मिळ ठेवा. अशावेळी रविवारी भरपावसात रानभाज्यांचा बाजार भरला आणि नागरिकांनी हा रानमेवा घरी नेण्यासाठी गर्दी केली.कोरोना काळात प्रत्येकाच्या मनाला भीतीने घेरले आहे. हा आजार होऊ नये यासाठी स्वत:ची रोग प्रतिकारशक्ती वाढविणे हा एकच पर्याय आपल्याजवळ आहे. ही प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी श्रावणात मिळणाऱ्या या रानभाज्या व रानफळांचा आहारात समावेश असणे महत्त्वाचे आहे. हे महत्त्व ओळखून जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय व प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने रविनगर शासकीय वसाहतीच्या मैदानात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. राज्यात १०४ प्रजातींच्या रानभाज्यांचा समावेश आहे. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, कृषी विभागाचे सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक मिलिंद शेंडे, आत्माच्या संचालक नलिनी भोयर प्रामुख्याने उपस्थित होते. महोत्सवाला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपवनसंरक्षक प्रभुदयाल शुक्ल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील भेट दिली.

रानफळांचीही मेजवानीखास विदर्भाचे वैशिष्ट्य असलेल्या नऊ भाज्यांसह इतरही पालेभाज्या व रानफळे दिसून येतात. अशा विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश महोत्सवात होता. १४ स्टॉलवर रानभाज्यांसह रानफळे उपलब्ध होती. शहरावासीयांसाठी अनोखी पर्वणी ठरली. औषधी गुणधर्मांसह त्यांच्या पाककृतींची माहिती स्टॉलवर असल्याने नागरिकांनी उत्साहाने या भाज्या खरेदी केल्या.

टॅग्स :vegetableभाज्या