शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कन्हान-बुटीबोरी पॅसेंजरला मध्य रेल्वेचा ‘ब्रेक’

By admin | Updated: January 28, 2015 01:01 IST

शहराची वाढती लोकसंख्या, आजूबाजूच्या गावातून नोकरीनिमित्त येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कन्हान-बुटीबोरी दरम्यान फास्ट पॅसेंजरची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. दपूम रेल्वेच्या

‘अपडाऊन’ करणाऱ्यांची गैरसोय : दहा महिन्यांपासून पत्रावर उत्तर नाहीनागपूर : शहराची वाढती लोकसंख्या, आजूबाजूच्या गावातून नोकरीनिमित्त येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कन्हान-बुटीबोरी दरम्यान फास्ट पॅसेंजरची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. दपूम रेल्वेच्या विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या बैठकीत यास मंजुरी देण्यात आली. परंतु नागपूर ते बुटीबोरी हा भाग मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येत असल्यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने मध्य रेल्वेला १० महिन्यापूर्वी याबाबत एक पत्र दिले. या पत्रावर मध्य रेल्वेने कुठलाच निर्णय न घेतल्यामुळे या प्रकल्पालाच ‘ब्रेक’ लागला आहे. नागपुरातून दररोज ५ हजार प्रवासी नोकरीनिमित्त शहरातून बाहेर जातात. तेवढेच लोक नोकरीसाठी शहरात येतात. परंतु त्यांच्या येण्याजाण्याची सुविधा नाही. बुटीबोरीत मोठी औद्योगिक वसाहत आहे. सोबतच मिहान आणि कार्गो हबचे कामही जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत कन्हान, कामठीवरून अनेक लोक नोकरीसाठी नागपूर आणि बुटीबोरीला जातात. त्यांना ये-जा करण्यासाठी रस्ते वाहतुकीची साधने कमी आहेत. या मार्गावर ५ ते ६ डब्यांची फास्ट पॅसेंजर कन्हान-बुटीबोरी दरम्यान चालविल्यास अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांची सुविधा होणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य प्रवीण डबली यांनी सूचना केल्यानंतर तत्कालीन दपूम रेल्वेचे डीआरएम वर्मा यांनी त्यास मंजुरी दिली होती. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने मध्य रेल्वेला १० महिन्यापूर्वी याबाबत पत्रही दिले. परंतु या पत्रावर मध्य रेल्वेने कुठलीच भूमिका घेतलेली नाही. कन्हान-बुटीबोरी पॅसेंजर चालविण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. कन्हान, कामठी, कळमना, इतवारी, नागपूर, अजनी, खापरी, बुटीबोरी रेल्वेस्थानकावर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. रेल्वे प्रशासनाने ठरविल्यास १० दिवसात ही पॅसेंजर सुरू होऊ शकते. परंतु रेल्वे अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे या प्रकल्पाला ब्रेक लागल्याची स्थिती आहे. (प्रतिनिधी)